पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमासह महिला, युवती व ज्येष्ठनागरिक, शालेय मुलांना सहभागी करत सामाजिकतेचा वसा जपणारे उपक्रमासोबत विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घोरपडी पेठ या भागातील अनेक गणेश मंडळ पदाधिकारी आणि अध्यक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागचे मा. राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सव केवळ उत्सव न होता एक सामाजिक चळवळ म्हणून प्रचलित झाले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सवात सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या प्रभाग क्र.18 मधील राष्ट्रवादी काँ. पा. अल्पसंख्यांक विभागचे मा.राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांच्या वतीने घोरपडी पेठ या भागातील १)हनुमान व्यायाम मंडळ २)श्रीमंत जय भवानी मित्र मंडळ ३)औदुंबर तरुण मित्र मंडळ या वरील सर्व मंडळाच्या अध्यक्षाचे विशेष आभार मानून शाल व नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
घरोघरी होणारा गणेशोत्सव सोहळा रस्त्यावर आला आणि त्यातून स्फुल्लिंग पेटायला लागले. लोकांपर्यंत समाज प्रबोधनाच्या जाणिवा, स्वातंत्र्याच्या जाणिवा, शिक्षणाचे महत्त्व, बदलती विचारसरणी पोहोचावी या उद्देशाने हा उत्सव सुरू झाला. या सगळ्यामध्ये उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येत होते आणि बौद्धिक, वैचारिक घुसळण होत होती. विचारांना दिशा मिळत होती. हळुहळू याचे स्वरूप बदलत या कार्यक्रमांमधून सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक चालना मिळायला लागली. मात्र हे सांस्कृतिक स्वरूपही बदलून गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सव म्हणजे मोठे अचंबित करणारे देखावे, उंच मूर्ती, गणेशभक्तांची गर्दी आकर्षून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न असे होऊ लागले. चर्चा होणाऱ्या मंडळांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक मंडळे पुढे प्रवास करतात. काही लहान मंडळांमध्ये अजूनही देखाव्यातून सामाजिक कार्य आणि प्रबोधनाचा प्रयत्न होतो मात्र या मंडळांबद्दल फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे असे सामाजिक व प्रबोधनात्मक कार्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळांना प्रेरणा मिळत नाही. पण त्यांचे सामाजिक कार्य हे समाज हिताच्या दृष्टीने मूल्यवान आहे.