मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांची हस्ते ५० कोटीच्या विकास कामांतर्गत पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहापर्यंत विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
हिंगणघाट शहराच्या इतिहासात एवढा मोठा रकमेचा निधी मिळणे ही ऐतिहासिक बाब असल्याचे आमदार कुणावार यांनी आयोजित विविध सभांमधून सांगितले. सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी शासना कडून एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. परंतु युती शासन सत्तारूढ होताच हिंगणघाट शहराच्या विकासाकरता ५० कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधी अंतर्गत शहरातील विविध रस्ते, नाल्याचे बांधकाम होणार आहे. तसेच काही अविकसित प्रभागातील कामे सुद्धा या निधी अंतर्गत होणार असून संपूर्ण कायापालट होणार आहे.
हिंगणघाट शहरात अमृत योजने अंतर्गत भूमिगत गटर लाईन व पाण्याच्या पाईपलाईन मुळे अनेक रस्त्याचे खोदकाम करावे लागले. याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत होता. ही बाब ध्यानात घेऊन आमदार कुणावार यांनी अशा खोदकाम झालेल्या रस्त्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना त्रास होणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय चौक या रस्त्याचे सिमेंटी करण व सौंदर्यीकरण होणार आहे. या कामाकरता १८ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. हे काम शहराचे मुख्य आकर्षण असून हा मुख्य मार्ग झाल्याने शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे.
याव्यतिरिक्त दहा कोटी रुपयांचा आणखी विशेष निधी विकास कामाकरीता मंजूर झाल्यानंतर असून त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात एक कोटी रुपयांचे योगा भवन तसेच याच परिसरातील तलावाच्या सौंदर्यकरणासह व विद्युतीकरण व पाथ वे बांधकामा करता १ कोटी ७५ लक्ष रुपये तसेच जीबीएमएम मोहता शाळा येथे आधुनिक डिजिटल वर्ग खोली व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करता एक कोटी रुपये प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रातील एकमेव गीता मंदिरचे पुनर्विकासा करता ८५ लक्ष रुपये, शहरातील ठाकूरदास बगीचा ते विश्रामगृह रस्त्या करता सहा कोटी , कलोडे चौक ते बालाजी टाऊन गेट पर्यंत ८५ लक्ष रुपये तसेच बिडकर वार्ड येथे पाण्याच्या टाकी परिसरातील सौंदर्यकरणाकरिता २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया सुरू आहे.
त्याचबरोबर हिंगणघाटच्या शासकीय विश्रामगृह करता ४ कोटी २७ लक्ष रुपये, समुद्रपुरच्या शासकीय विश्रामगृहाकरता २ कोटी २० लक्ष रुपये तसेच पंचायत समिती समुद्रपूर च्या इमारत बांधकामासाठी ११ कोटी ८६ लाख रुपये त्याच बरोबर पंचायत समिती हिंगणघाटच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर झाले असून त्याचे सुद्धा काम लवकरच सुरू होणार आहे. हिंगणघाट वनावर नदीवरील बंधारा बांध कामा करीता ५० कोटीचा निधी मंजूर झाला असून येत्या वर्षभरात या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे. येत्या काळात हिंगणघाट शहरातील जनतेला २४ तास पाणी देण्याचा माझा मानस आहे. असेही आमदार कुणावार यांनी सांगितले.
आमदार समीर कुणावर यांनी शासनाकडून कोट्यावधीचा नीधी खेचून आणला त्यामुळे केवळ हिंगणघाट शहराचाच नव्हे तर या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा पुरता बदलणार आहे. आमदार समीर कुणावार यांचा शहरातील भूमिपूजन सोहळा तब्बल १५ दिवस चालणार आहे. यानिमित्ताने आयोजित विविध सभांना नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने नागरिक प्रतिसाद देत आहे. आमदार कुणावर यांच्या विकास कामाच्या झंझावातामुळे विरोधकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले असून आमदार कुणावार यांचा अश्वमेघ रोखण्याचे मोठे आव्हान येत्या काळात विरोधकांसमोर राहणार आहे.

