स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संवाद कार्यक्रम चर्चा ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांशी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वडकी:- विद्यार्थी जीवनातचं विद्यार्थांनी उंच स्वप्न बघून अभ्यासात्मक प्रवृत्तीने ते साकार केले तर कमी वयात आपण देशाच्या आयएएस परीक्षेचे उद्दिष्ट साध्य करुन आपण चांगले प्रशासकीय अधिकारी बनू शकता असे मत मी आयएएस अधिकारी बनेलचं अकादमीचे संचालक प्रा.डाँ. नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
स्माल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे मी ‘आयएएस होणारच” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सदर कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणात ५०० विद्यार्थांनी सहभाग घेतला. या प्रसंगी हायस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुमधुर गीताने संगीत वाद्यवृंदाच्या शैलीत देश व राष्ट्रहित असणारे गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे पथसंंचालन व स्वागत गीत या संवाद कार्यक्रमाचे विशेष आकर्षण केंद्र ठरले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या गुणवंत, कलावंत, संगीत सुमधुर आवाजात सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेशचंद्र काठोळे तर प्रमुख अतिथि सामाजिक कार्यकर्ते भारतीय सेवा मंडळाचे संस्थापकध्यक्ष राम आखरे यांनी विद्यार्थ्यांना “आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला माणूस कसा घडेल “याबाबतीत अतिशय सुंदर आणि योग्य असे उदाहरणे देत मार्गदर्शन केले. आयएएस, आयपीएस बनताना प्रथमता विद्यार्थ्यांनो देशभक्ती व राष्ट्रहित जोपासत माणूस बना हा संदेश याप्रसंगी भाषणात दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संस्थाप्रमुख व प्राचार्य मंजुषा दौलत सागर तर विशेष अतिथी भारतीय युवा संस्कार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव प्रदीपकुमार नागपूरकर,कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रवींद्र तिराणिक, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जनमंच सदस्य नागपूर, विशेष निमंत्रक अशोक पारखी, चंद्रपूर प्रा.डॉ. चंद्रकिरण घाटे, संगीत विभाग प्रमुख , मीडिया प्रतिनिधी अभियंता समीर आसुटकर, किनी जवादे, माजी सरपंच नम्रता काकडे, शिल्पा शेट्टे, राजूभाऊ झोटिंग, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल भेदुरकर व प्रास्ताविक नितीन गवळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्य संयोजक रवींद्र तिराणिक यांनी करून दिला.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रदीपकुमार नागपुरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची असलेली भीती व न्यूनगंड घालवून सकारात्मकता जागृत निर्माण करण्याचे आवाहन केले. तर प्रा. डाँ. काठोळे यांनी विद्यार्थांना भारतीय नागरी सेवा अंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा देण्यासाठी अभ्यासाच्या सोप्या पद्धती व त्यातील बारकावे उपस्थित शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोजचे काम रोजच करा. स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने समोरे जाताना वेळेचे योग्य नियोजन करा .अनावश्यक कामामध्ये वेळ वाया घालवू नका हा विचार याप्रसंगी व्यक्त केला . संगीत विभाग प्रमुख प्रा .डॉ. चंद्रकिरण घाटे यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता” विविध प्रार्थना स्फूर्ती गीते व समारोपीय पसायदान सादर केले. विद्यार्थी संवाद कार्यक्रमात वडकी परिसरातील पालक वर्गासोबत कन्या शाळा, सैनिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, सर्वोदय शाळा रिधोरा, सोनामाता शाळा चहांद आदीसह अन्य शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षक वृंदासहित प्रामुख्याने उपस्थित होते.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमाची सांगता स्मॉल वंडर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या कुमारी मंजुषा दौलतराव सागर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अहमद शेख, विजय फुलकर ,शंकर मालखेडे, शनौ शेख, चंदा गोबाडे, वैभव करडे, दिपाली दैवलकर, अक्षय वानखेडे व विद्यार्थी प्रतिनिधी खुशी ताजने, हर्षदा राजूरकर, संस्कृती राजुरकर यांचे आता अथक परिश्रम लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

