Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यां करिता “करिअर संधी व्याख्यानाचे भव्य आयोजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यां करिता “करिअर संधी व्याख्यानाचे भव्य आयोजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सावनेर 30 सप्टेंबर:- स्थानिक लायन्स क्लब आणि भालेराव विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्यातील संधी आणि पर्याय ‘ या करिअर विषयक व्याख्यानाचे महाविद्यालयात यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.सुनील डोंगरे यांनी भूषविले तर राजेश प्रायकर, वरिष्ठ पत्रकार दै.सकाळ प्रमुख अतिथी होते. कौशल्य विकास मार्गदर्शक आणि लेखक डॉ. अनिल इंगुलकर प्रमुख वक्ते म्हणून आणि वत्सल बांगरे चार्टर प्रेसिडेंट लायन्स क्लब सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब यांनी केले.

यावेळी डॉ. अनिल इंगुलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उदाहरण व कृतीपूर्ण मार्गदर्शन केले. रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संदर्भात संपूर्ण यशप्राप्ती साठी फक्त ज्ञानार्जन पुरेसे नसून योग्य दिशेने कृतीची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थी जीवनात लक्ष निर्धारित कसे करावे, राज्य, केंद्र आणि खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या उपलब्ध संधी,स्टार्टअप आणि स्वयंरोजगाराकरिता शासकीय योजनांची सविस्त्तर माहिती दिली.

यावेळी प्रमुख अतिथी राजेश प्रायकर यांनी सुद्धा प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. मोबाईलचे फायदे -तोटे,नियमित वाचन, लेखनाचे महत्व, पत्रकारिता एक करिअर यावर विचार प्रकट केले. तसेच देशातील वाढत्या विद्यार्थी आत्महत्येवर चिंता व्यक्त करून संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांनी दिला. संचालन प्रा.चंद्रशेखर पोटोडे तर आभारप्रदर्शन वत्सल बांगरे यांनी केले. शहरातील भालेराव विज्ञान महाविद्यालय, राम गणेश गडकरी महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय, रेवनाथ चोरे महाविद्यालय, आदमने महाविद्यालय येथील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते दोन्ही मूळचे ग्रामीण भागातील आणि भालेराव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने उपस्थित विद्यार्थी प्रेरित झालेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता रुकेश मुसळे सचिव लायन्स क्लब, हितेश ठक्कर कोषध्यक्ष, प्रवीण टोणपे, प्रा.मृणालिनी बांगरे, किशोर सावल, डॉ.शिवम पुण्यानी, डॉ.प्रवीण चव्हाण, ऍड. मनोजकुमार खंगारे, प्रा.प्रवीण दुलारे, विलास सोहगपुरे,किशोर मानकर, सुरेश मेंढे, राजाराम तागडे,आकांक्षा ऋषिया,धनश्री लेकूरवाळे, देवयानी चोरे, साक्षी कुरळकर, प्रियांशु नाचणकर, श्रुती जामदार, पायल लांबट, पूजा घ्यार, स्मृता सौंधीया, स्वेता अनंतवार यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी नॅक समन्वयक प्रा.मिलिंद बरबाटे, प्रा.रवींद्र भाके, डॉ.प्रशांत डबरासे, डॉ.प्रकाश काकडे, डॉ.अमिता वाटकर, डॉ. प्रविणा साळवे, डॉ.शालिनी साखरकर, डॉ.प्रदीप आठवले, प्रा. विजय जुनघरे, ऍड.अभिषेक मुलमुले प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट शहरातील रामनगर, (प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न.

Next Post

आलापल्लीचा राजा गणेशोत्सव निमित्याने भावीकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतिने महाप्रसादाचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्लीचा राजा गणेशोत्सव निमित्याने भावीकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतिने महाप्रसादाचे वाटप.

आलापल्लीचा राजा गणेशोत्सव निमित्याने भावीकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतिने महाप्रसादाचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In