संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- गणेशोत्सवातील देखावा आणि डीजे साउंड अशा गोष्टींवर अवाजवी खर्च न करता पाचगाव येथील विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ यांनी व पाचगाव गावातील गणपती मंडळातील सदस्य व होतकरू तरुनाणी एकत्र येत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील गणेश मंडळ हे नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव कायम या गणेश मंडळाला असते. अशीच सामाजिक बांधिलकीची जाणीव या मंडळांने जोपासली आहे. विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळाच्या जवळपास अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी गावातील अनेक नागरिकानी स्वयमफुर्तीने यात भाग घेतला.