उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोल्यात वीज वितरण विभागात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झल्याची माहिती समोर आली आहे. त्यात 8 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण अकोला जिल्हातील वीज वितरण कंपनी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी संगमत करून वीज केंद्रातील भंगार विक्रीत मोठ्या प्रमाणात अपहार केला होता त्यामुळे महापारेषणनं प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे हे प्रकरण….
2022 मधील एप्रिल महिन्यात अकोला आणि कारंजा येथील उपकेंद्रांचं हे भंगार होते. दोन्ही ठिकाणांवरील 85210 किलोपैकी 4775 किलो भंगाराची या अधिकाऱ्यांनी अफरातफर केली होती. या भंगार विक्री प्रकरणात महापारेषणचे सहा अभियंते आणि दोन अधिकारी यांना निलंबित केले आहे. महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ही कारवाई केलीय.
यात रमेश कृष्णराव वानखडे : कार्यकारी अभियंता, राहुल रामदास पाटील : अतिरिक्त कार्यकारी अभियंता, दत्ता दिनकर शेजोळे : अतिरिक्त कार्यकारी अभियंता, श्याम मेश्राम : अतिरिक्त कार्यकारी अभियंता, गोपाल दिलीप लहाने : उपकार्यकारी अभियंता, श्रीकांत टेहरे : उपकार्यकारी अभियंता, सुरेश पेटकर : उपव्यवस्थापक वित्त व लेखा, संजीत मेश्राम : उपव्यवस्थापक अशा आठ अधिकाऱ्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अकोल्यातील महापारेषणच्या वीज उपकेंद्र आणि कारंजा उपकेंद्रात 2018 साली 852010 किलो वजनाचे भंगार होते. मात्र 2022 साली भंगाराचे वजन केले असता तब्बल 4775 किलो कमी भंगार भरल्याची बाब समोर आली. ही बाब समोर आल्यनंतर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर आठ जणांचे निलंबन करण्यात आले परंतु अद्याप काही प्रश्न अनुत्तरीत आहे.
कारंजा येथील उपक्रेंद्रातून 4775 किलो भंगाराचा अपहार झाला. अपहार झाला तरी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. जवळपास पाच टनाचे भंगार नेण्यासाठी ट्रकची आवश्यकता असते. ते भरण्यासाठी किमान 10 ते 12 मजूर लागतात. मात्र यासंदर्भात कोठेच कोणतीच नोंद नाही. तसेच अपहाराबाबत पोलीस चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

