मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्या करीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीला कृती समितीचा संघर्ष आताही सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलना चा काल १२५ वा दिवस शासकीय वैद्यकिय महविद्याला महिला कृती समितीने निषेध करण्यात आला आहे.
हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज करीता महिलांद्वारे ठरल्याप्रमाणे दर रविवारी सृजनात्मक रीत्या डॉ. आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी काळी ओढणी परिधान करून १२५ वा दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्ष नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिर कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्नावर प्रतिउत्तरात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेज चे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले होते. आता ती बाब त्याच मुद्द्यावर येऊन ठेपले आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ ह्यांची भेट आणि त्यांचे कॅबिनेट बैठकीत बसून मागणी मान्य करून घेण्याचे आश्वासन अशा इतर वेगवेगळ्या घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये होण्यास अनुकूलच घडल्या. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न आताही सुरूच आहेत.
महिला कृती समितीच्या आंदोलकांनी आंदोलन तसेच पुढे रेटायचे ठरवले होते. त्याप्रमाणे त्यानुसार काल 125 व्यां दिवशी महिलांनी काळी ओढणी परिधान करून प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं ह्यांचा निषेध केला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व सुनियोजित कृती करण्यास पाठपुरावा सरकार आणि प्रतिनिधी ह्यांनी करावा अन्यथा आंदोलन असे चालूच राहील असा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समिती च्या वातीनी देण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने सावित्री च्या लेकी सामाजिक संस्थेच्या सीमा मेश्राम, राजश्री बांबोळे, मोनाली फुलझेले, नंदिनी मांडवे, भारती वैद्य, भाग्यश्री नगराळे, बबीता ढेपे, सविता झिलटे, निर्मला भोंगाडे, संध्या जगताप, माई बांबोळे, शारदा जांभुळकर, वनिता बुटलेकर, प्रीती चव्हाण इ. उपस्थीत होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

