रविंद्र भदर्गे,जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके व संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेस हार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेचे मैदान स्वच्छ केले. अनेक विद्यार्थ्यांनी शास्त्री व महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. तसेच त्यांनी सांगितलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी विद्यार्थ्यांकडून संकल्प करून घेतला. संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांनी विद्यार्थ्यांना लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच आपल्या जीवनामध्ये स्वच्छतेचे काय महत्त्व असते हेही सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक वृंदामध्ये पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिलारे, पोर्णिमा गायकवाड, साक्षी झरेकर, सुरज पहाडे, निकिता खालापुरे, अरुण चंदने, शितल मुंडे, बळीराम पवार, महानंदा व्यवहारे, साधना पाईकराव इतर कर्मचारी वर्गामध्ये शुभम चव्हाण व सुमन ढब्बे यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

