Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

शिवसेना ठाकरे पक्षाच्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातून योजनांचा भांडाफोड, अहेरी तालुक्यातील डुम्मे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
शिवसेना ठाकरे पक्षाच्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातून योजनांचा भांडाफोड, अहेरी तालुक्यातील डुम्मे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गडचिरोली जिल्यातील अहेरी विधानसभे अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली (डुम्मे) येथे शेकडो युवकांचा शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात जाहीर प्रवेश

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या नेतृत्वात तसेच अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजीराव खोडदे पाटील आणि अहेरी विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली होऊ द्या चर्चा अभियान कार्यक्रम दि. १ ऑक्टोंबर पासून सुरू झाला असून, दि. २ ऑक्टोंबर ला एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद गट गुरुपल्ली- येमली अंतर्गत डुम्मे गावात घेण्यात आले.

‘होऊ द्या चर्चा’ करूया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रमाची संचालनाची धुरा युवासेना तालुकाप्रमुख श्री अक्षय पुंगाटी यांनी पार पाडली. प्रास्ताविक भाषण शिवसेना एटापल्ली तालुका प्रमुख मनीष दुर्गे यांनी केले. यामध्ये असे म्हटले आहे की, महागाईने सर्वसामान्य जनता होरपडून जात आहे. हाताला काम नसल्याने युवकांमध्ये नैराश्य पसरत आहे, खाजगीकरण व कंत्राटीकरण मुळे युवकांमध्ये प्रचंड संताप असून, ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातून या संतापाला वाट मोकळी करून दिली जाणार आहे. असे सांगून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका मांडली.
त्यानंतर अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजना फक्त कागदावर रंगवल्या जातात परंतु प्रत्यक्षात या योजना शेवटच्या माणसांपर्यंत, गाव- खेड्या पर्यंत अजून पोहोचलेलेच नाहीत आणि या योजनांची कल्पना सुद्धा जनतेला नाही. यामध्ये फक्त मतदारांचे दिशाभूल करण्याचे काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करीत आहेत. गोरगरिबांचा मेहनतीचा पैसा केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापर करीत आहे.

या अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रमुख मूलभूत गरजा रस्ते, पाणी, वीज याची सुद्धा पूर्तता होत नाही आहे. भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली तरी सुद्धा हा गडचिरोली जिल्हा आणि अहेरी विधानसभा क्षेत्र आजही मागासलेला आहे. या विधानसभेमधून आमदार झालेत मंत्री झाले परंतु याचा कोणी वाली नाही असे मत व्यक्त केले.

त्यानंतर या ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव खोडदे पाटील अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या काही योजनांची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, व्यापारी व सर्वसामान्य वर्गात या सरकार बद्दल प्रचंड नाराजी असून जनता ना खुश आहे. या सर्व फसवेगिरी योजनांमुळे जनतेची दिशाभूल करीत आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यात पक्ष फोडाफोडीच गलिच्छ राजकारण करीत आहे. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवू आणि संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकवू असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाप्रसंगी अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली डुम्मे गावातील अनिश दुर्वा, राजकुमार दूर्वा, सुजल गावडे, गोपी मडावी, शुभम दहागावकर, नरेश मडावी, राकेश पेगडपल्लीवार, सोमेश्वर पुंगाटी, समीर मडावी, अर्जुन दुर्वा व शेकडो युवकांनी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आले.याप्रसंगी नामदेव हिचामी नगरसेवक न.पं. एटापल्ली, दानू आत्राम युवा सेना तालुका चिटणीस, यश झाडे शाखाप्रमुख, नरेश दुर्वा उपशाखाप्रमुख, डुम्मे गावचे पोलीस पाटील जोगाजी मडावी, जोगाजी दूर्वा, गाव (भूमीया) अरुणजी दूर्वा, गावातील प्रतिष्ठित नागरिक लालूजी पुंगाटी, पोलाजी दूर्वा, सुभाषजी खोब्रागडे, रेेैणुजी पुंगाटी, मधुकर जी पुंगाटी, चमरूजी दूर्वा तसेच सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Previous Post

गडचिरोली: अधिकारी तुपाशी अन् उपोषणकर्ता उपाशी; भ्रष्टाचारी पाठीशी, रामटेके यांचा आमरण उपोषणाचा 9 वा दिवस कार्यवाही मात्र शून्य.

Next Post

वर्धा जिल्हात चार तरुण तरुणांनी मिळून घरा समोर हत्या केली तरुणीची सपासप वार करून हत्या, गावकऱ्यांनी चौघांना पकडले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात चार तरुण  तरुणांनी मिळून घरा समोर हत्या केली तरुणीची सपासप वार करून हत्या,  गावकऱ्यांनी चौघांना पकडले.

वर्धा जिल्हात चार तरुण तरुणांनी मिळून घरा समोर हत्या केली तरुणीची सपासप वार करून हत्या, गावकऱ्यांनी चौघांना पकडले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In