हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभा, तालुका राजुरा शाखा, शहर शाखा, ग्राम शाखा यांच्या मार्फत बामणवाडा तालुका राजुरा येथील लुंबीनी बुध्द विहार बामणवाडा येथे दिनांक 02/10/2023 रोज रविवार ला समता सैनिक दल चे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रजलित करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात करण्यात आली. यावेळी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. धर्मुजी नगराळे. भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा, प्रमुख मार्गदर्शक आयु.प्रफुल भगत जिल्ला उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर, आयु. गुरुबालक मेश्राम जिल्ला सचिव भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये समता सैनिक दल म्हणजे काय? समता म्हणजे जात, धर्म, लिंगभेद, न्याय, हक्क, अंधश्रद्धा, स्वातंत्र्य, बंधुत्व सर्व व्यसनापासून अलिप्त अशा लोकांच्या समूह व विषमतेला नश्ट करून समता प्राप्त करणारी टोळी यास समता असे म्हणतात. सैनिक म्हणजे देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे किवा समाजाचे सौरक्षण करणारा व स्वत: प्रशिक्षित शिस्तबध्द व लढाऊ शिक्षण घेतले असलेल्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. दल म्हणजे लढाई करणारी टोळी किंवा संघटना यास दल असे म्हणतात. व या तीनही कार्यास मिळून समता सैनिक दल असे म्हणतात.
या समता सैनिक दलाची स्थापना दि. २० मार्च १९२७ साली महाड या ठिकाणी झाली. त्यानंतर सामूहिक परेड घेण्यात आली आणि बामणवाडा राजुरा तालुका मध्ये आज दिनांक 02/10/2023 रोज रविवार ला लुंबीनी बुध्द विहार बामणवाडा तालुका राजुरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर” चे आयोजन करण्यात आले. आणि आयु.साक्षी नळे, यश वाघमारे, मयुरी वानखेडे, माया वाघमारे, सूप्रबोध नगराळे या सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सुंदर संचालन स्वेता वाघमारे व आभार प्रदर्शन लताताई नगराळे यांनी केले. प्रमुख उपस्थित श्रुती भरती बल्लारपूर, चरणदास नगराळे, खरतड सर रामपूर, अनिल लभाने, गौतम चौरे, गौतम देवगडे आणि प्रशिक्षण घेणारे 40 सैनिक व उपासक व उपासिकानी समता सैनिक दल चे प्रशिक्षण मध्ये भाग घेतला आणि सैनिकांना दुपारी केळी दिली व शेवट सुजाताताई नळे कडून मसाला भात देण्यात आला. नंतर सामूहिक सरणत्य घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

