मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट चे वतीने १ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक गौरक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक डॉ. उषा साजपुरकर, प्रा. लतिका बेलेकर, महेश दीक्षित, रामदास खडगी, अरुण पंडित, हरिसिंग ठाकूर,बंडू घिये, शेषराव महाबुधे, नेताजी लाजुरकर यांना शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल म्हणाले की आपल्या घरातील जेष्ठ नागरिक हाच कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ कुटुंब सदस्यांना मिळत असतो.त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान जोपासला पाहिजे असे सांगून जेष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह संचालन प्रा.किरण वैद्य यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार सचिव पराग मुडे यांनी मानले. या कार्यक्रमाला न.प.मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, माजी नगरसेवक सुनील डोंगरे, विनोद झाडे, विजय भगत, विशाल ब्राह्मणकर, राजेश कोचर, दुर्गाप्रसाद यादव, अजयकुमार यादव, विपिन खिवसरा, एड. विशाल खिवसरा, सुनील अलोनी, नंदू मुजे, मनोज सिंघवी, अशोक सिंघवी, संजय मानमोड़े, विक्की ठाकुर, महेश खडसे, हितेंद्र जोबनपुत्र, प्रसाद पाचखेड़े, ताराचंद सिंघवी उदय शेंडे, सुभाष शेंडे, चंद्रकांत रोहणकर, बाबा धाईत, दुर्योधन शिवणकर, शुभांगी वैद्य, किरण अग्रवाल, अनुराधा मोटवानी, नंदीनी जवादे, मंगला शेंडे, प्रतिभा सिंघवी आदी पदाधिकारी व सदश्य उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

