उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि. ५ ऑक्टोबर:- मौजे सलगरे ता. मिरज जिल्हा सांगली येथील गट क्र. ७३३/१, ७३६, ७५९ (सुमारे ३०० एकर) ही जमीन बॅकवर्ड क्लास सोसायटीचे सभासद कसून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्यामुळे सदर जमिनीवर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कला किंवा कोणत्याही उद्योगाला ही जमीन देऊ नका या मागणीसाठी सलगरे येथील बंधू भगिनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत.
आज उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख नझीर झरी, मानतेश कांबळे, इरफान केडिया यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरच आपल्याला न्याय देऊ शकतात लवकरच त्यांची भेट होणार आहे. तुम्ही कोणत्या राजकीय नेत्यांच्या व आमदार खासदार यांनी दिलेल्या अमिषाला बळी पडू नका लवकरच तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल आणि तो अंतिम असेल असा शब्द दिला सर्व समाज बांधव यांचेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपोषणकर्ते व सर्व समाज बांधवांन सोबत अरुण कांबळे, विक्रम कांबळे, नविनकुमार कांबळे, अनिल कांबळे, निशांत शिंगे, रंगराव कांबळे, संती कांबळे, दिपक कांबळे, राहुल कांबळे, मोहन कांबळे, संदिप कांबळे, महिंद्रा कांबळे, सुरज कांबळे,गजनान कांबळे उपस्थित होते.

