मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम) यांच्या सौजन्याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिशे देण्यात येत आहे. करिता भव्य गरबा नृत्य स्पर्धा इच्छुक व्यक्तीनं भाग घ्यावा व आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गरबा : गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य. ‘गरबी’ व ‘गरबा’ असे याचे दोन प्रकार आहेत. पुरुषांनी वर्तुळाकार उभे राहून समूहगीत गात, टाळ्या वाजवत, साध्या पदविन्यासांनी केलेले नृत्य ‘गरबी’ आणि स्त्रियांनी नाजुक अंगविक्षेपांनी केलेले नृत्य ‘गरबा’ होय. हे नृत्य प्राचीन काळापासून गुजरातमध्ये प्रचारात आहे. म्हणून यंदा सिरोंचा शहरात आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व गरबा प्रेमींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा हा कार्यक्रम शनिवारी ता. २१ ला सायंकाळी ८:०० वाजता क्रीडा संकुल सिरोंचा सभागृहात होणार आहे.या कार्यक्रमाला प्रवेश फी मोफत शुल्क करिता गरबा आवड असलेल्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक टायगर ग्रुपतर्फे करण्यात येत आहे. संपर्कासाठी:-(९४२१८५७१५०) (९४०४९३५१६९)(८२७५४७४७६७) (७७८०६२३८४४)(९४०४८४२८९८)

