पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०५/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ३, पुणे कडील सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना बातमी मिळाली की ११ वर्षापासून पॅरोल रजेवरून फरार असलेला आरोपी नामे खुशाल मुंडे रा. बावधन, जि. पुणे हा गेली ११ वर्षापासून फरार असून तो चांदणी चौकतील वेधभवनजवळ मित्राची वाट बघत थांबलेला असलेबाबत बातमी मिळाल्याने त्यास सदर बातमीचे ठिकाणी जावून शोध घेता चांदणी चौकाकडून वारजेकडे जाणा-या सर्व्हिस रोडवरील वैधभवनपासून २०० मीटर अंतरावर पुणे येथे १) खुशाल चिंधु भुंडे वय ५३ वर्षे, रा. शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे, २) अमित बाळासाहेब दगडे वय ३७ वर्षे, रा. स. नं. १७, शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे ३) मनिष सहदेव मोरे वय ३५ वर्षे रा. स. नं. १७. शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे असे तिघे मिळून आले. त्यांचेकडे दोन पिस्टल, चार जिवंत राऊंड, एक रॅम्बो चाकु, तीन मोबाईल हॅन्डसेट व एक मोटर सायकल असा एकुण १,२०,०००/- चा माल मिळून आलेला आहे.
आरोपी नामे खुशाल चिंधु भुंडे वय ५३ वर्षे, रा. शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे याचेकडे केले तपासात त्याचेविरूध्द हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १९४/२००६ भादंविक ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्हयामध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नमुद आरोपी शिक्षा भोगत असताना त्याने सन २०१२ मध्ये पॅरोल रजेकरीता अर्ज केला होता. त्यास रजा मंजूर झाल्यावर रजा भोगून तो मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याऐवजी तो बगाहा (बिहार) राज्यात पळून गेला. सदर कालावधीत त्याने बिहार, मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वास्तव्य करत होता. मागिल दिड महिन्यांपासून बावधन, पिरंगुट परीसरात लपून रहात होता. आरोपी नामे खुशाल चिंधु भुंडे याने उत्तरप्रदेशवरून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत राऊंड घेवून आला होता. नमुद आरोपीविरूध्द वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्टचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
आरोपी नामे अमित बाळासाहेब दगडे वय ३७ वर्षे, रा. स. नं. १७ शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे व मनिष सहदेव मोरे वय ३५ वर्षे रा. स. नं. १७, शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे यांचेविरूध्द यापुर्वी हिंजवडी पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पुणे शहर मा. पोलीस सह-आयुक्त श्री संदीप कर्णिक, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पुणे शहर मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे पुणे शहर मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. सुनिल तांबे पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहिरट, पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप- निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कटटे, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढिल तपास अजितकुमार पाटील पोलीस उप-निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३. पुणे शहर हे करीत आहेत.

