आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात शासन द्वारा देण्यात येणाऱ्या रेशन धान्याचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरिबाच्या ताटातले धान्य हे तस्कर हजम करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच एका राशन धान्य तस्करावर पोलिसांनी धडक कारवाई करत बेड्या ठोकल्या आहे.
रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार करणा-या एकास वर्धा जिल्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी संशयिताकडून तेरा टन तांदूळ, एक ट्रॅकसह साडे बारा लाखांचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सावंगी पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली आहे.
वर्धेच्या सावंगी मेघे परिसरात पोलिसांनी एका गोडाऊनवर धाड टाकत रेशनिंगच्या तांदुळाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख रहीम याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. सावंगी मेघे पोलिसांनी (कलम 124 अनुसार कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तांदुळाच्या काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सावंगी मेघे परिसरात शेख रहीम हा मागील काही दिवसांपासून रेशनिंगच्या तांदुळाचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावंगी मेघे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सावंगीच्या एका कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या गोडाऊनवर धाड टाकली.
या तपासणीत एका ट्रॅकसह पोलिसांना तेरा टन तांदूळ आढळून आला. याबाबत रहीम याच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आढळून आली नाही. पोलीसांनी त्याला कायदाचा बडगा दाखविला. रेशनिंगच्या तांदुळाचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात काळाबाजार केला जातं आहे.
पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी यापूर्वी पुलगाव येथे धाड टाकत महेश अग्रवाल नामक व्यापाऱ्यावर कारवाई केली होती. यानंतर आर्वी येथे कारवाई करण्यात आली तर आता सावंगीतही काळाबाजार करणाऱ्याचा भंडाफोड केला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

