पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
वाकड पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०८/१०/२०२३ रोजी २३/२० वाजण्याचे सुमारास, जे. एस. पी.एम. कॉलेज परिसर, ताथवडे, पुणे येथे येथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरुन वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन महसुल खात्याकडील अधिकारी, व एम. एन. जी. एल. फायर ब्रिगेड यांना कळवून योग्य ती उपाययोजना केली त्यामध्ये तपास केला असता सदर ठिकाणी आग ही गॅसचे टैंकर गाडी क्र GI 16 AW 9045 मधुन नोजल पाईप द्वारे गैस चोरुन व्यावसाईक गैस टाक्या भरण्याचे चालु असताना गॅस लिकिज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले सदर आगीमध्ये जेएसपीएम कॉलेज आवारात पार्क केलेल्या ब्लॉसम स्कुलचे तीन स्कुल बस, गॅसवा टैंकर, गॅस चोरून नेण्यासाठी सिलींडर असलेला टेम्पो इत्यादी जळुन नुकसान झाल्याने आरोपी यांनी संगणमत करून प्रोपीलीन गैस या जिवनावश्यक वस्तुची बेकायदेशीर पणे व स्वताचे आर्थिक फायद्याकरीता चोरी करुन त्याची काळ्या बाजारात वाढीव दरात विक्री करण्यासाठी व्यावसाईक गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरताना केलेल्या कृती मुळे मोठ्या प्रमाणात आग लागुन स्फोट होऊन मानवी जिवितास धोका निर्माण केला तसेच मालमत्तेची हानी केली. तसेच सदरवे काम गैर कायदेशिर असल्याची माहित असताना सुध्दा पैश्याचे मोबदल्यात जागा मालक नामे चंद्रकांत महादेव सपकाळ याने आपली जागा उपलब्ध करून दिली म्हणुन सर्व आरोपींविरुध्द चाकड पोलीस स्टेशनचे पोउनि भारत माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने वाकड पो स्टे गुरंन, ९८०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९.४०७, २८५,३३६,४२७,३४ व जिवनावश्यक वस्तु अधिनीयम कलम ३७ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३४ प्रमाणे कायदेशिर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी यांना वाकड पोलीसांनी तात्काळ निष्पन्न करुन आरोपी १ ) महिपाल चौधरी, रा. साई पॅराडाईज सोसा. पुनावळे २) राहुलकुमार राजदेवराम, रा. बेलठीका नगर, थेरगाव, पुणे, ३) चंद्रकांत महादेव सपकाळ रा. जे. एस. पी.एम कॉलेज जवळ ताथवडे पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेविरुध्द अटक कारवाई चालु आहे. तसेच एक आरोपी फरार असुन त्याचा शोध चालु आहे. गुन्हयाचा सखोल तपास करुन आणखी इतर कोणाचा सहभाग निष्पन्न होत असल्यास त्यांना अटक करुन त्याप्रमाणे पुढील कायदेशिर कारवाई करीत आहोत.