महाराष्ट्र संदेश न्युज प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील घाटंजी तालुक्यातील घोटी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. ही घटना समोर येताच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाप्रती मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे.
आश्रम शाळेत 25 विद्यार्थांना जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 12 विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
घाटंजी तालुक्यातील घोटी येथे युगनिर्माण विजाभज आश्रम शाळा आहे. दिनांक 9 ऑक्टोंबर सोमवारला दुपारला जेवण केल्यावर 25 विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी होऊन ताप आला व अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केलेत. त्यातील 12 विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जेवण किंवा अतिउन्हामुळे हा त्रास झाला असावा, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय ठमके यांनी सांगितले.
संस्थाचालक म्हणतात, ही तर अफवा
युगनिर्माण विजाभज आश्रमशाळेचे संस्थाचालक साहेबराव पवार यांनी शाळेत असा कुठलाही प्रकार घडला नाही, जाणीवपूर्वक अफवा पसरवली जात आहे, असे सांगितले. प्रार्थनेच्या वेळी काही मुलींना मासिक पाळीमुळे त्रास झाला, त्यांचे बघून इतर विद्यार्थीही घाबरले, त्यातून हा प्रकार घडला. कोणताही विद्यार्थी रुग्णालयात दाखल नसल्याचे पवार म्हणाले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

