अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मोबा नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 10 ऑक्टोंबर:- भारतातील बहुजन समाजाची मुठ बांधुन राजकारणात बहुजन कार्यकर्त्यांना सक्रीय करुन भारतीय राजकारणात बहुजनांची हिस्सेदारी मिळवून देणा-या बहुजननायक मा. कांशीराम यांचा 17 व्या स्मृतीदिनी सावनेर येथील बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिंनाक 9 आँक्टोंबर ला बालाजी सेलिब्रेशन सावनेर येथे अभिवादन केले.
15 मार्च 1934 ला कांशीराम यांचा जन्म पंजाब प्रांतात झाला होता. कांशीराम ज्यांना बहुजन नायक किंवा मान्यावर किंवा साहेब म्हणूनही ओळखले जाते हे भारतीय राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी आणि राजकीय एकत्रीकरणासाठी काम केले, भारतातील जातिव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी व इतर पिछडा वर्ग ओबीसी वर्गांतील कार्यक-त्यांना एकत्रित करत कांशीराम यांनी 1971 मध्ये दलित शोषित समाज संघर्ष समिती (डी एस-4), ऑल इंडिया बॅकवर्ड्स आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ बामसेफ आणि 1984 मध्ये बहुजन समाज पक्षची स्थापना केली.
त्यांनी बासपाचे नेतृत्व त्यांच्या उत्तराधिकारी मायावती उर्फ बहनजी यांना दिले व चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले. अश्या अनेक आठवणी कार्यक-त्यांनी ताज्या करत मा. कांशीराम यांना अभिवादन केले. यावेळी जनकल्याण बहु. संस्थेचे अध्यक्ष भगवान चांदेकर, शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले, प्रशांत ठाकरे, गजु कोमुजवार , विक्रम गमे, उमेश गणोरकर, पुरुषोत्म काळे, उत्तम रागासे, गोलु पारवे, गणपती पठाणे, राजकुमार चांदेकर, विनोद मांडवकर सहित इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

