तिरुपती नालल्ला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील ग्राम पंचायत भुरकुंडा येथे 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात जन सुविधा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ता व स्मशानभूमी शेड चा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर, उद्द्घाटक भाजप राजुरा विधानसभा निवडणूक प्रमूख देवराव भोंगळे, प्रमुख अतिथी भाजप तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे, भाजप तालुका महीला आघाडी अध्यक्ष सुनंदा डोंगे, सरपंच बैनाबाई विश्वेश्वर आत्राम, उपसरपंच अजय राठोड, भाजपाचे, दिलीप गिरसावळे, प्रदिप बोबडे, ग्रा.पं. सदस्य संतोष मरसकोल्हे, मंजुशाताई चहाकाटी, सविता रेगुंटवार, सुनीता लोहट, पो.पा. अमृत आत्राम यांचे सह प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

