पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- गणेशोत्सव दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या परिश्रमामुळे यंदाही हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडला. सर्वच पोलीस बांधवांना हा गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबीय समवेत साजरा करता येईलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे स्थित केअर कल्चर अँड आर्ट फॉर रेस्टॉराटीन ऑफ (CARE- Culture and Art for Restoration of Environment) संस्थेमार्फत पुणे पोलीस व कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक सोहळ्याचे पंडित भीमसेन जोशी सभागृह,औंध, पुणे येथे दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान भक्ती व सुगम संगीताचे सादरीकरण तालमणी श्री खंडेराव मुळे यांनी केले. त्यांच्या या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्याच प्रमाणे केअर संस्थेच्या विविध उपक्रमांतर्गत विशेष कामगिरी बजावलेल्या कलाकारांपैकी डॉ. विजय पाटील, कु.अनिका कानडे, चि. अन्वित रणसिंग, व मराठी इंडियन आयडल फेम श्री सुरेश कदम यांचे गायन तर कु. अनुष्का घोडेकर, कु. आसावरी फडणीस, कु. अक्षता खानविलकर, वेदांता अकॅडमीच्या सौ. श्रुती झनकर शिंदे यांच्या विद्यार्थिनी व कथक अलंकार सौ. मंजुषा हंकारे यांचे नृत्य सादरीकरण करण्यात आले.
पुणे व परिसरातील कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देऊन कला व संस्कृती संवर्धनातून पर्यावरण संवर्धन विषयी जनजागृती करण्याचा मानस संस्थेचा असल्याचे माहिती यांनी संस्थेच्या सौ जया ठेंगे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार (पुणे शहर), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (पुणे शहर) पोलीस आयुक्त विनय चौबे (पिंपरी चिंचवड शहर) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांनी मार्गदर्शन करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना सदर कार्यक्रमासाठी कुटुंबासह उपस्थित राहण्याविषयी गॅझेट द्वारे आवाहन केले.
सदर कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनातर्फे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर व राखेलकर पोलीस निरीक्षक पुणे, यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अरविंद माने यांनी पोलीस प्रशासनामार्फत मनोगत व्यक्त करून आभार मानले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधव यांनी आपल्या कुटुंबीय समवेत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर वारेगावकर व क्षितिज कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे अतिशय मार्मिक सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा डांगे व डॉ. महेशकुमार वडदरे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. भाग्यश्री पायगुडे यांनी केले.