उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- मेहकर येथील शासकिय विश्रामगृह येथे समता पक्षाचे व मेहकर लोणार विधानसभा मतदार संघाचे आमदार पदाचे उमेदवार तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 ऑक्टोंबर बुधवार रोजी होणाऱ्या आगामी काळात लोकसभा, विधानसभा उमेदवारासाठी पक्षाची व संघटनेच्या बांधनीसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी समता पक्षाचे नेते तथागत ग्रुपचे संस्थापक संदिपभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली समता पक्षाच्या विदर्भ विभाग अध्यक्षपदी कुणाल माने यांची निवड करण्यात आली व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुढील कार्यकारिणी मध्ये महाराष्ट्र प्रदेश महासचिव गौतम नरवाडे, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सुनिल वनारे, महाराष्ट्र प्रदेश प्रसिध्दी प्रमुख राधेशाम खरात, विदर्भ विभाग महासचिव नितीन बोरकर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सचिन गवई, मेहकर शहर अध्यक्ष सिताराम गवई, यांच्या निवडी करण्यात आल्या आहे यावेळी समस्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..

