आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे काही लोकांना हरणाच्या मटणावर ताव मारणं महागात पडलं आहे. वर्ध्यामध्ये हरणाची शिकार करून हॉटेलमध्ये मटण पार्टी करण्यात आली. हा प्रकार वर्ध्याच्या सावंगी परिसरात समोर आला आहे.
हरणाची शिकार करून मटण करणाऱ्या प्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वर्ध्याच्या आंजी परिसरातून या हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. सावंगीच्या चौकातील ठाकरे किचन या हॉटेलमध्ये मटण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हरणाची शिकार केलेला मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

