पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील फिर्यादी हे कोथरुड स्थित बांधकाम व्यवसाय कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपीताने फिर्यादी यांना मोबाईल क्रमांक ९३९५१६९७७१, ६००३६२७७२ वरुन ऑफिसचा मो.क्र. ९१५८००२९४७ यावर मेसेज व संपर्क करुन कंपनीचे संचालक बोलत आहेत असे भासवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन लबाडीचे इरादद्याने फिर्यादी यांच्या कंपनीच्या अकाऊंट मधुन आरोपीतांनी त्यांचे 1) Jamaluddin Shaikh Acc. No. :- 50100307953492, IFSC- HDFC0000455 यामध्ये रक्कम 9.80.506 / रु. 2 ) Babai Das. Ac. No. :- 50100557991780, IFSC- HDFC0001717 यामध्ये रक्कम 35,90,608/- रु. 3)) Tankeswar Bora. Acc. No. :- 50200078339545, IFSC- HDFC0009250 यामध्ये रक्कम 20,70,408/- रु. असे एकुण रक्कम रु. 66,41,522/- हे ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणुक केली म्हणुन फिर्यादी यांनी दि. 18/05/2023 रोजी फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.रजि. नं. 60/2023, भा.द.वि. कलम 419, 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 (सी), (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयामध्ये यापुर्वी लखडी दरगाह, ता. बरहरिया, जि. सिवान, राज्य बिहार येथुन एका आरोपील अटक करण्यात आलेली होती. गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करून तसेच ATM सेंटरच्या CCTV FOOTAGE च्या आधारे आरोपीतांचा ठावठिकाणा हा इजमाली गाव, जि- सिवान, राज्य, बिहार येथील असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सिवान, बिहार येथे सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलीस पथक पाठवून सदर गुन्हा करण्या-या टोळीतील मुख्य आरोपी नामे 1) बेलाल शाबीर अन्सारी, वय 21 वर्षे, रा. इजमायली, पो. लखडी दरगाह, ता. बरहरिया, जि. सिवान, राज्य बिहार, 2) कामरान इम्तियाज अन्सारी, वय 23 वर्षे, रा. इजमायली, पो. लखडी दरगाह, ता. बरहरिया, जि. सिवान, राज्य बिहार यांना दि. 05/102023 रोजी अटक करून त्यांना मा. अपर मुख्य न्यायालय तृतीय, सिवान, बिहार यांचे ट्रान्झीट रिमांड घेवुन त्यास सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे घेऊन आलो, त्यास आज रोजी मा.न्यायालयासमोर हजर केले असता अटक आरोपीस दि. 13/10/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 1) विविध मोबाईल कंपनीचे एकुण 36 SIM 2 ) मोबाईल फोन 08, 3) विविध बँकांचे एकुण 19 ATM कार्ड व 02 चेकबुक, 4) 01 गावठी कट्टा व 06 जिवंत राऊंड. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत हे करीत आहेत. तसेच आरोपी यांच्या ताब्यात मिळालेले काही क्ष्ग कार्ड व बँकेचे डेबिट कार्डशी संबंधीत बँक अकाउंट हे 1) सायबर पोस्टे गु.र.नं. 193/2023 भादवि कलम 419, 420 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(सी),(डी), हा ४० लाख रु. फसवणुकीचा गुन्हा. 2) जुबली हिल्स पोलीस स्टेशन, हैद्राबाद शहर (तेलंगना राज्य) येथील गुरनं. 608/2023 भादवि कलम 419,420 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(सी), (डी) या 25 लाख रु. हे दोन्ही फसवणुकीचा गुन्हातील निष्पन्न झाली आहेत.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे की, वर नमुद बँक अकाऊंट नंबर व मोबाईल नंबर यांचा वापर करून कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेशी संपर्क करावा.
सद तपास मा.श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, मा. आर. एन. राजे, सहाय्यक पोलीस अपर आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि मिनल सुपे-पाटील, पो.नि. चंद्रशेखर सावंत, पोउपनि प्रमोद खरात, सपोउपनि संदेश कर्णे, पोलीस अंमलदार दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रविणसिंग राजपुत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे, राजेश केदारी, योगेश व्हावळ सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन यांनी केला असून तपासामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

