विकास समितीचे अध्यक्ष योगेश कोतकोंडावार आणि तुषार बोगामी यांनी ग्रामसेविका संतोषी सडमेक यांना निवेदनातून मागणी.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत तिमरम हद्दीतील तिमरम, निम्मलगुडम, गुड्डीगुडम, झिमेला येथील नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांना ठेवण्याकरिता सदर गावांमध्ये शवपेटीची प्रचंड कमतरता वेळोवेळी भासत असून आलापल्ली, चंद्रपूर याठिकाणाहून शवपेटी आणावी लागते त्यासाठी प्रचंड वेळ वाया जात असून वेळप्रसंगी त्या ठिकाणी शवपेटी उपलब्ध राहत नाही.
यामुळे अडचण निर्माण होते ही गरज लक्षात घेता येथील नागरिकांसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन तिमरम, निम्मलगुडम, गुड्डीगुडम, झिमेला गावाकरिता तात्काळ शवपेटी उपलब्ध करून द्यावे अशी मागणीचे निवेदन ग्रामसेविका संतोषी एस. सडमेक यांना तिमरम विकास समितीचे अध्यक्ष योगेश कोतकोंडावार तसेच तुषार बोगामी यांनी दिले.

