मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- सिरोंचा तालुक्यातील 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा या गावाचे गायक – संतोष पंतांगी,महेश गोरा यांची तालुक्यातील सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गायक कलाकार – संतोष पंतांगी, महेश गोरा यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आरडा मल्लिकार्जुन स्वामी देवांवर अती सुंदर आवडता गाणे गायन करून आरडा परिसरात गायक कलाकार म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या प्रमाणे या ऑक्टोंबर महिन्यांत पारंपरिक पद्धतीने येत असलेल्या नवरात्री या दिवसात तालुक्यातील महिलांनी बातुकम्मा उत्सव साजरा केली जाते.
या बातुकम्मा उत्सवात बातुकम्मा देवींच्या अनेक गाणे गायन करत महिलांनी साजरा करतात. अशा बातुकम्मा उत्सवाला आरडा गावातील कलाकार गायक – संतोष पंतांगी, महेश गोरा या युवकांनी बातुकम्मा देवींवर अती सुंदर गाणे गायन करून तालुक्यात सर्वत्र चर्चेत आली आहे.
ही माहिती तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे मूलकला फाउंडेशनचे प्रमुख सागर मूलकला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे टीमचे कार्यकर्ते स्वामीराज मूलकला, राजकुमार मूलकला, गणेश सॅन्ड्रा, टीटू बंदेला, कृष्णा कावेरी,सह कार्यकर्त्यांनी कलाकार गायक संतोष पंतांगी, महेश गोरा, दिग्दर्शक नरेश गट्टू यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे सत्कार करून गौरविण्यात आले. त्यावेळी सागर मूलकला यांचे मित्रपरिवारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

