मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी,दि.05 सप्टेंबर:- अहेरी तालुक्यातील मौजा आरेंदा येथे सण 2005 पुर्वी ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते वैयक्तीक वन हक्क दाव्यांचे अर्जांची वाटप अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना करण्यात आले.
2005 पूर्वी पासून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी शेती करण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी शेतीचे अतिक्रमण करून शेती करायला सुरुवात केली. पण अजुन पर्यंत वन हक्क दाव्यांनुसार ही शेती त्यांचा नावाने झाली नाही. त्यामुळे वैयक्तीक वन हक्क दाव्यांचे अर्जांची वाटप अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ.भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थीत अतिक्रमण शेतकऱ्यांना मार्गदर्शनात म्हणाले की, आमदार श्री धर्मराव बाब आत्राम यांच्या प्रयत्नाने अतिक्रमण जमिनीची मोजणी ला प्रत्येक्षात सुरु झालेली आहे, म्हणून आता सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांनी न चुकता वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज भरावे. यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल याची काही गॅरंटी नाही. असे म्हणाले तसेच वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज कसा भरायचे हे सुध्दा शेतकऱ्यांना समजावून संगण्यात आला.
यावेळी अर्जांची वाटप करतांना मौजा आरेंदा, पेरमीली, कोरेल्ली बु, कचलेर, कोरेल्ली खुर्द, चौडामपल्ली, ताडगुडा, कोरेपल्ली, मिरकल, गोपनार इत्यादी गावातील अतिक्रमण शेतकरी आले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधान सभा अध्यक्ष लक्ष्मण येररावार, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, श्री. निमगडे ग्राम सेवक आरेंदा, फिरोज मडावी तलाठी चौडामपल्ली, रवि मेश्राम तलाठी पेरमीली, कोत्ता आत्राम, महारू गावडे, राकेश महा, देवाजी सडमेक, सुरेश पेंदाम, मंगेश आत्राम, शंकर चांदेकर, चंदू आत्राम, ईरपा तलांडी, कन्ना वेलादी, दामा गावडे, नामदेव दहगावकर, रामजी आत्राम (कोतवाल), दिपक कुळमेथे (कोतवाल), पोच्या दुर्गे, नागेश आजारे, सौ. देवे आत्राम यांच्या सह अतिक्रण शेतकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

