पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
गुन्हे शाखा युनिट 2 पुणे शहर..
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- रेकॉर्डवरील अट्टल घरफोडी चोरास जेलमधून सोडवण्यासाठी प्रथम एक घरफोडी चोरी केली, साथीदार जेल मधून सुटताच दोघांनी मिळून घरफोडी चोऱ्या करून, 200 ग्रॅम सोन्याचे, 300 ग्रॅम चांदीचे दागिने व इतर असा सर्व मिळून 12,01,632/- रु चा मुद्देमाल हस्तगत करून पुणे शहरातील 04 व सातारा जिल्ह्यातील 01 गुन्हा असे एकूण 05 गुन्हे उघडकीस .माननीय वरिष्ठ सो यांच्या आदेशान्वये सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 65/2023 भा. द. वि. कलम 454,457,380 या गुन्ह्याचा तपास, युनिट – 2 प्रभारी श्री अधिकारी श्री. नंदकुमार बिडवई, यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नि नितीन कांबळे पोलीस अंमलदार संजय जाधव, अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेन्द्र चव्हाण अशी टीम तयार करून, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने युनिट -2 कडील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व अमोल सरडे यांच्या गुप्त बातमीवरून 1) अंकुश राम गोणते वय 32 वर्ष रा. सर्वे नंबर 111,दत्तनगर, दत्त मंदिरा जवळ सुतारदरा कोथरूड पुणे 2) हर्षद गुलाब पवार वय 30 वर्ष रा. सर्वे नंबर 111,दत्तनगर, दत्त मंदिरा जवळ सुतारदरा कोथरूड पुणे / मूळ रा. मु. पो. कुळे ता. मुळशी जि. पुणे यांना अटक करण्यात आले होते. आरोपी अंकुश गोणते याने त्याचा जेलमधील साक्षीदार हर्षद पवार याला जामीनवर सोडण्यासाठी घरफोडी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर साथीदार हर्षद पवार हा जामीनावर सुटतात दोघांनी मिळून पुणे शहर तसेच सातारा जिल्हा येथे घर फोडी चोऱ्या केल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून, दाखल गुन्ह्यातील 57 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर गुन्ह्यातील 143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी गाडी, लोखंडी कटवणी, दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन, स्क्रू ड्रायव्हर असा सर्व मिळून 12,01,632/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत,
1) सरकार नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर 65/2023 भदवी कलम 454,457,380
2) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु र नं646/2023 भादवी कलम 454,380
3) हडपसर पोलीस स्टेशन गु र.नं 1535/2023 भादवी कलम 454,380
4) कोंढावा पोलीस स्टेशन गु र नं
989/2023 भादवी कलम 454,380
5) शिरवळ पोलीस स्टेशन गु र नं.253/2023 भादवी कलम 454,380
आरोपी अंकुश गोणते हा खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. त्यादरम्यान त्याची ओळख अट्टल घरफोडी चोर हर्षद गुलाब पवार याचे सोबत झाल्याने, त्यांनी जामीनावर सुटल्यानंतर घरफोडी चोऱ्या करण्याचे ठरविले होते. सदर ठिकाणी मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने हर्षद पवार हा त्याच्या दिमतीत विक्री करत असल्याने त्यास दाखल गुन्ह्यात भादवी कलम 411 प्रमाणे वाढ करण्यात आलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. सुनील तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई , यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अमोल सरडे , गजानन सोनुने , पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, नागनाथ राख, गणेश थोरात, विनोद चव्हाण,उत्तम तारू, साधना ताम्हाणे, उज्वल मोकाशी,शंकर नेवसे, निखिल जाधव,मोहसिन शेख,नामदेव रेणुसे, या पथकाने केलेली आहे