Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड व दोन आरोपींना ठोकल्या बेडया ….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड व दोन आरोपींना  ठोकल्या बेडया ….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- थेरगाव परीसरातील इसम नामे सुरज ऊर्फ जंजीर कांबळे वय ३० वर्षे रा. जगतापनगर लेन नं ५ थेरगांव पुणे हा मिसिंग असलेबाबत त्याची पत्नि आरती सुरज कांबळे यांचे तक्रारीवरून वाकड पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २८४ / २०२३ प्रमाणे दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली. सदरचा इसम मिसॉंग झाले पासुन त्याचे बाबत कोणतीही माहीती मिळत नव्हती. दि. ११ / १० / २०२३ रोजी आरती सुरज कांबळे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात मिसींग इसम सुरज कांबळे हे त्यांचे मित्र पंकज पाचपिंडे यांचे सोबत दारु पिणेसाठी गेल होते त्यानंतर ते परत घरी आले नसलेबाबत माहीती प्राप्त झाली. पंकज पाचापड हा मिसींग तक्रार दाखल झालेनंतर त्याचा फोन बंद करून कोठेतरी निघुन गेला असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे सदर मिसींग मध्ये काहीतरी गंभीर घटना घडली असावी हे ओळखुन मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकौल सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदारांसोबत मिसीग व्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार मिसींग व्यक्तीचा व त्याचे सोबत असणारे पंकज पाचपिंडे याचा शोध घेत असताना अशी माहीती प्राप्त झाली की, मिसग इसम, पंकज पाचपिंडे व त्यांचा मित्र अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड असे दि.०५/१०/२०२३ रोजी दारु पिणेसाठी थेरगाव मध्ये बसले होते. त्यानंतर सुरज कांबळे हा घरी परत आलेला नाही. पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड हे वाकड पोलीस स्टेशन येथे मिसींग दाखल झालेनंतर कोठेतरी निघुन गेले असल्याचे माहीती प्राप्त झाली. त्यामुळे तपास पथकाने तांत्रीक विश्लेषण व पारंपारीक तपास पध्दतीने तपास सुरु केला असता माहीती भेटली की १) पंकज रतन पाचपिंडे वय २८ वर्षे रा. जय मल्हार कॉलनी नं ५ थेरगांव पुणे २) अमरदिप ऊर्फे लखन दशरथ जोगदंड वय- ३३ वर्षे रा. म्हातोबा बारणे यांची खोली, चांदनी चौक, थेरगाव गावठाण, थेरगांव, पुणे. मुळपत्ता मु.पो. आंबेजोगाई, साठे नगर, परळी वेस्ट, बीड हे बिड जिल्हयात लपुन बसले आहेत. त्यामुळे मा. वरिष्ठांचे परवानगीने तात्काळ एक पथक बिडला रवाना करून दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन तपास केला असता त्यांनी सांगीतले की, दि.०५/१०/२०२३ रोजी सुरज कांबळे, पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड असे तिघेजण पंकज पाचपिंडे राहत असलेल्या जय मल्हार कॉलनी नं.०५ थेरगाव पुणे येथील घरात दारु पित बसले असताना, सुरज कांबळे याने आई बहीणीवरुन घाणेरड्या शिवीगाळ केल्याने रागाचे भरात पंकज पाचपिडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड यांनी चाकुने सुरज कांबळे याचे गळ्यावर वार करुन त्याचा खुन केला.

त्यानंतर आरोपी पंकज पाचपिंडे चालवित असणारा तिनचाकी टेम्पो मध्ये सूरज कांबळे याची बॉडी एका गोधडीत गुंडाळुन बावधन ग्रंथील गायकवाड वस्ती मधील हायवे खालील नाल्यात टाकुन दिली. त्यानंतर ते दोघे काही घडले नाही अशा अविभावात दोन दिवस आपले नियमीत काम करीत होते.सुरज कांबळे याचे पत्निने दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसींग तक्रार दाखल केले नंतर पंकज पाचपिंडे हा सूरज कांबळे याचेपत्निस घरी जावून भेटुन सुरज हा दि.०५/१०/२०२३ रोजी त्याचे सोबत दारु पिणेस होता. परंतु दारु पिले नंतर रात्री ०१.०० वा सुमा. तो घरी परत गेला आहे अशी हकीकत सांगीतली. त्यामुळे सुरवातीला आरती कांबळे यांना पंकज पाचपंडे याबाबत कोणतीही शंका निर्माण झाली नाही. परंतु पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फे लखन जोगदंड यांना पोलीस तपासात आपले पर्यंत पोहोचणार याची भिती निर्माण झालेने, ते दि.०८/१०/२०२३ रोजी पासुनच पुण्यातून निघुन गेले होते. मनुष्य मिसींगचे झाले तपासावरुन तपासी अधिकारी पोउपनि सचिन चव्हाण यांचे फिर्यादीवरून वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १००८ / २०२३ भादविक ३०२, २०१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचेकडे विश्वासात घेवून चौकशी करून आरोपींनी मयत सुरज कांबळे यांची बॉडी ज्या ठिकाणी टाकली होती ते ठिकाण शोधुन बॉडी ताब्यात घेणेत आलेली आहे. सदर मयतावर ससून हॉस्पीटल पुणे येथे पोस्टमार्टम करणेत आले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहे.

एकंदरीत तीन चांगले मित्र दारू पित बसले असताना शिवीगाळ केलेचे किरकोळ कारणावरून त्यांचेत वाद होवून त्यांनी मित्राचा खुन कला आहे. तसेच खून केल नंतरही खून लपविणेसाठी त्याची बॉडी नाल्यात टाकून आपले नियमीत काम करीत होते. तसेच पोलीसांना आपले बाबत माहीती मिळेल याची जाणीव झालेवर फोन बंद करुन अंबाजोगाई जि.बिड येथे जावून आपले अस्तित्व लपवून बसलेल्या दोन आरोपींना वाकड पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना दिनांक २४/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त असून तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो. पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि, सचिन चव्हाण, सपोफौ. बाबाजान इनामदार, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पाहवा, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना, अतिक शेख, पोना, विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि कांतेय खराडे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

Previous Post

पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशद ! कोंढव्यात बिलावरून झालेल्या वादात हॉटेल मालकावर उगारला कोयता….

Next Post

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरटयास अवघ्या दोन तासांत पकडुन चोरटयाकडुन चोरी केलेली रोख ५,२५,००० /- रक्कम हस्तगत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरटयास अवघ्या दोन तासांत  पकडुन चोरटयाकडुन चोरी केलेली रोख ५,२५,००० /- रक्कम हस्तगत.

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरटयास अवघ्या दोन तासांत पकडुन चोरटयाकडुन चोरी केलेली रोख ५,२५,००० /- रक्कम हस्तगत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In