Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरटयास अवघ्या दोन तासांत पकडुन चोरटयाकडुन चोरी केलेली रोख ५,२५,००० /- रक्कम हस्तगत.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरटयास अवघ्या दोन तासांत  पकडुन चोरटयाकडुन चोरी केलेली रोख ५,२५,००० /- रक्कम हस्तगत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

खडक पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- एका केक मटेरियलच्या दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,०००/- रुपये चोरी झाल्याची घटना खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधिल काशेवाडी भागात घडली होती.सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हाफिजुर रहेमान कयामुद्दीन अन्सारी, वय ५० वर्षे, धंदा- केक मटेरिअल विक्री, रा. गिरनार क्लासिक सोसा, अॅक्सीस बँकेच्या वरती, नानापेठ, पुणे यांचा केक मटेरियल विक्रीचा व्यवसाय असुन गेली २५ वर्षापासुन अशोकनगर कॉलणी, काशेवाडी भवानी पेठ, पुणे येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे. दिनांक १५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० चाजता ते स्वतः दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यावेळी आठवडयातील व्यवसायातून जमा झालेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मोजुन दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती. त्यानंतर दिनांक १६/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ०८.०० वा. दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मिळुन आली नाही. सदरबाबत त्यांनी तात्काळ खडक पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६२/२०२३ भा.दं.सं. कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

घरफोडी सारखा गंभीर गुन्हा घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार, सहायक पोलीस निरिक्षक नितीनकुमार नाईक व पो.ना. ७६६१/ तांबोळी, पो.शि.८५०० पांडे, पो. शि. १८०४ शेख यांचे तपास पथक नेमण्यात आले. नेमण्यात आलेल्या पथकामार्फत अज्ञात चोरटयाचा शोध चालु असताना तपास पथकातील अंमलदार पो.शि.८९४८ चव्हाण, पो.शि. ९१०२ बाबळे यांना त्यांचे खब-यामार्फत माहीती मिळाली की, काशेवाडी येथे राहणारा झुरळ्या ऊर्फ आकाश पाटोळे याने रात्री अशोकनगर कॉलनीत चोरी केली असुन तो पळुन जाण्याच्या तयारीत आहे. अशी माहीती मिळाल्यानंतर तात्काळ वरील दोन पथकांमार्फत त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे, वय २७ वर्षे, धंदा- मजुरी, रा. अंजुमन मस्जीद शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे यास दत्तमंदीराजवळील सार्वजनिक शौचालयाजवळुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपीकडुन गुन्हयात चोरी करुन नेवुन लपवुन ठेवलेली रोख रक्कम रू. ५,२५,०००/- हस्तगत करण्यात आली. आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन नमुद घरफोडी ची तक्रार प्राप्त झाल्यांनतर अवघ्या दोन तासांतच चोरी केलेल्या संपुर्ण मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळण्यात खडक पोलीसांना यश आले आहे.

नमुद सर्व कारवाई ही श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. अशोक धुमाळ सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी श्री. राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितीनकुमार नाईक, श्रेणी पो.उप.निरिक्षक अजीज बेग, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, आशिष चव्हाण, सागर घाडगे, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, रफिक नदाफ, लखन डावरे, समीर तांबोळी, तेजस पांडे, अश्रफ शेख यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड व दोन आरोपींना ठोकल्या बेडया ….

Next Post

बोरी येथील कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली आर्थिक मदत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बोरी येथील कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली आर्थिक मदत.

बोरी येथील कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In