राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
धाबा :- गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथुन अगदी जवळ असणाऱ्या डोंगरगाव येथील राजेंद्र लखमापूरे यांच्या गुरांच्या गोठ्यात जहाल विषारी नाग साप होता त्या सापाला पाहून त्यांचा परीवारातील सर्वात भितीचे वातावरण निर्माण झाले त्यांचा मणात येवडी भिती निर्माण झाली की गुरांचा गोठा घराला लागून असल्यामुळे स्वताच्या घरात जाण्यासाठी घाबरत होते.
अखेर राजेंद्र लखमापूरे यांनी सर्प मित्र दीपक वांढरे यांना फोन करून याबाबत माहिती दिली माझ्या घरी साप आहे. अशी माहिती मिळताच सर्प मित्राने लगेच त्यांच घर गाठलं तिथे जाऊन बघता एक भला मोठा साप तिन तासापासून त्यांच्या गोठ्यात होता नंतर सर्पमित्र दिपक भाऊ वांढरे यांनी येऊन सापाला जीवनदान दिले सापाला पकडून डोंगरगाव येथील जंगलात सोडण्यात आले.

