पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दि. 15 ऑक्टोंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ब्लिस गार्डन नर्सरीजवळ, साळुंखे बिहाररोड, कोंढवा खुर्द, पुणे येथे असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या रोडच्या कडेला सर्फराज रियाज शेख, वय 39 वर्षे हे आपल्या मित्रा बरोबर मनोज सोनटक्के, रा. कमेला वस्ती, कोंढवा खु. पुणे थांबलेलो असताना त्यांच्या ओळखीचे इसम नामे कल्लु, वय अंदाजे 30 वर्षे, आसिफ, वय अंदाजे 28 वर्षे, अज्जु, वय अंदाजे 30 वर्षे, वसिम, वय अंदाजे 30 वर्षे, सर्व राहणार कमेला वस्ती, कोंढवाखुर्द, पुणे या आरोपींनी फिर्यादीना आमच्याकडे का बघता ? या कारणावरुन सर्फराज व मित्र मनोज सोनटक्के यास अशिल शिवीगाळ करुन, लाकडी बांबु व बेल्टने मारहाण करुन माझ्या डाव्या हातास फ्रेंक्चर करुन गंभिर जख्मी केले.
याप्रकरणी सर्फराज रियाज शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी कोंढवा पोलीस तक्रार दाखल करून आरोपी विरूध्द भादवि कलम ३२५, ३२३, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संतोष सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पो.स्टे. पुणे यांच्या मार्गदर्शनात गणेश तोरगल, सहा. पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे पुणे, गणेश तोरगल, सहा. पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे पुणे करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज रियाज शेख व त्यांचे मित्र मनोज सोनटक्के याचेसह ब्लिस गार्डन नर्सरीजवळ रोडच्या कडेला थांबले असताना सदर ठिकाणावरुन त्यांचे दुचाकीवरुन जाणारे त्यांच्या ओळखीचे इसम कल्लू, आसिफ, अज्जु, वसिम हे सर्वजण त्यांचा जवळ येवुन त्यांना म्हणाला की त्यांचेकडे का बघता ? या कारणाने आरोपीने सर्फराज व त्यांचा मित्र मनोज यास वाईट वाईट शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कल्लू, आसिफ, अज्जु व वसिम यांनी त्यांना व माझा मित्र मनोज यास लाकडी बांबु व पट्टयाने मारहाण करुन निघुन गेले. झालेल्या मारहाणीत त्यांचा डाव्या हातास फ्रॅक्चर झाले आहे. तसेच हाता-पायांवर व पाठीला मारहाणीचे वळ आले आहेत. तसेच उजव्या हाताचे दोन बोटांना टाके पडलेले आहेत.
त्यानंतर फिर्यादीने सना हॉस्पिटल, कौसरबागरोड, कोंढवा खु. पुणे येथे औषधोपचार घेतलेले आहेत. सदर प्रकारामुळे फिर्यादी खुप घाबरल्यामुळे लागलीच तक्रार देण्यासाठी आलो नव्हते. आज रोजी औषधोपचार करुन तक्रार देण्यासाठी ते कोंढवा पोलीस ठाणे येथे आल होते त्यांची तक्रार दाखल करून पुढील तपास आम्ही सुरू केला आहे.