कर्मच्याऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या बायजुस ट्युशन सेटंर व पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी वर तात्काळ कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे.
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बायजुस ट्युशन सेटंर अकोला येथे एक कर्मचारी पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत होते. सदर सुरक्षा रक्षक यांची ड्यूटी बायजुस ट्युशन सेटंर आनंद हाईट्स हुतात्मा स्मारक चौक नेहरू पार्क खंडेलवाल भवन च्या बाजुला गौरक्षण रोड अकोला इथे होती. सुरवातीला त्या कर्मच्याऱ्याला असे सांगण्यात आले होते की, त्यांची ड्यूटी हप्त्यातील फक्त शनिवार आणि रविवार या दोनच दिवस व महिन्यातील ८/१० दिवस राहील व त्या सुरक्षा रक्षकाला ड्यूटी वर रुजु होण्याआधी पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी ने ७/८ हजार रुपये पगार राहील असे सांगुन बायजुस ट्युशन सेटंर येथे कामावर रुजू करून घेतले व सुरवातीला जानेवारी महिन्यात ७००० हजार रुपये पगार दिला. व त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून फक्त ३/४ हजार रुपये पगार देत होते. त्यांना वारंवार विचारले असता पुढच्या महिन्यात पगारामध्ये लागुन येईल असे सांगण्यात येत होते.
त्यानंतर सप्टेबंर महिन्यात पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी व बायजुस ट्युशन सेटंरचा करार संपला असुन सदर सुरक्षा रक्षक यांचा गेल्या आगस्ट महिन्यातील व सप्टेंबर महिन्यातील पगार बाकी आहे. पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी कडून पगार देण्यास टाळाटाळ करत आहेत. फोन वर विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांना सदर सुरक्षा रक्षक यांनी सांगितले की, लेबर कोर्टात व पोलीस स्टेशन ला तुम्हची तक्रार करणार आहे. तर त्यांना पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी व बायजुस ट्युशन सेटंरचे अधिकारी म्हणतात की कुठेही तक्रार कर पगार बायजुस कडे बाकी आहे जेव्हा ते लोक आम्हाला देतील तेव्हा देऊ अशी दमदाटी व दादागिरीची भाषा बोलत आहेत.
बायजुस ट्युशन सेटंर येथे कार्यरत इतर कर्मचारी यांना पण पगार देण्यास बायजुस ट्युशन सेटंर चे अधिकारी असाच मानसिक त्रास देत आहेत. सदर सुरक्षा रक्षकाला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होत असुन लवकरात लवकर गेल्या 9 महिण्यानुसार दिशाभूल करून कमी पगार देण्यात येत आहे. गेल्या 9 महिण्यानुसार बाकी असलेला पगार व गेल्या दोन महिन्याचा बाकी असलेला पूर्ण पगार मिळावा याकरिता सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी आज सहाय्यक कामगार आयुक्त यांना पत्र देऊन त्या सुरक्षा रक्षकाचा पगार त्वरित देण्यात यावा व कर्मचारी यांची दिशाभूल करणाऱ्या बायजुस ट्युशन सेटंर व पॅराग्रिन सिक्युरिटी कंपनी वर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

