पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसाअगोदर नागपुरात पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यांतील काँग्रेसच्या कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित होते. हा वाद इतका वाढला की दोन्ही गट एकमेकांना भिडले आता या बैठकीत भाषण करताना काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नागपुरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसच्या या नेत्याने आपल्या वक्तव्याबाबत माफी न मागितल्यास चांगला धडा शिकवू अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
नागपुर येथे काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी झाली. बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता आणि बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मुत्तेमवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत शेकडो कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या आपल्या विधानावर जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्यावर प्रसंगी चांगलीच पंचाईत करण्यात येईल असा इशारा दिला आहे.