मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील ग्रामपंचायत रंगधामपेठा येथील भाजपा कार्यकर्ता लक्ष्मीनारायण कोनम यांच्या पत्नीची १७/१०/२०२३ रोजी रंगधामपेठा येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.विशेष म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा रामेश्वर वय १९ याचा रविवारी ८/१०/२०२३ सायंकाळी कालेश्वर येथे गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू होता.त्या दुःखातून सावरत नाही तोच पत्नीलाही मृत्यूने गाठल्यामुळे त्यांच्यावर आघात झाला आहे.याबाबत माहिती मिळताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तातडीने आर्थिक मदत आपल्या कार्यकर्त्याद्वारे पोहोचविली.
यावेळी शंकर नरहरी, चंद्रय्या सदनपू, श्रीनाथ राऊत, माधव कासर्लावार, सितापती गट्टू, मुरलीधर राचावर, श्रीनिवास कोठारी, संजीव जोडे, श्रीनिवास चौधरी, हरीश कोतावडला, मनोज मोलगुरी, पार्वतालु देनाबोईना, महेश कारकरी आदी उपस्थित होते.