पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- बौध्द धर्माचा पांढरी मधून संपूर्ण जगात प्रसिद्ध असेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दिक्षेने पवित्र झालेली दीक्षाभूमी येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन २४ ऑक्टोबरला करण्यात आले आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनावर महान सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमीवर बसवण्यात येत आहे. याठिकाणी कर्नाटकातून 25 हजार अनुयायी दीक्षाभूमीवर येणार असून हजारो अनुयायी धम्म दीक्षा घेणार आहेत.
तामिळनाडू येथील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट यांच्याकडून महान सम्राट अशोक यांचा हा भव्य दिव्य पुतळा तयार करण्यात आला असून दीक्षाभूमीला भेट देण्यात येणार आहे. केरळ राज्यातील मुनदकयाम येथून एक धम्म यात्रा निघाली आहे. ही यात्रा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामार्गे नागपुर येथील दीक्षाभूमीवर येणार आहे. तामिळनाडूतील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट या यात्रेत सहभागी झाली असून सम्राट अशोक यांचा पुतळाही याच यात्रेसोबत आणण्यात येत आहे.
यात्रेदरम्यान सर्व ठिकाणी संविधान, बुद्ध ॲण्ड हिज धम्म व सम्राट अशोक यांची छोटी प्रतिमा भेट देण्यात येत आहे. ही यात्रा २१ ऑक्टोबरला नागपुरात दाखल झाला आहे. दीक्षाभूमीवर आल्यावर सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमी स्मारक समितीला भेट देण्यात येणार आहे.
कर्नाटकातून येणार २५ हजार अनुयायी: धम्मदीक्षा दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटक राज्यातून २५ हजार अनुयायी येणार असून बुद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची माहिती आहे.

