निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
मो.नं.९०६७७६९९०६
वेडली,दि.5 सप्टेंबर:- व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय वेंडली येथे शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक तथा सावित्रीबाई फुले बहू.शिक्षण व प्रशिक्षण संस्था भोयगाव चे संस्था अध्यक्ष श्री. मारोतरावजी काकडे सर, माजी मुख्याध्यापक राजेंद्र विद्यालय भोयगाव तथा संस्था कोशाध्यक्ष श्री.सुरेशजी जोगी सर, तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय उपरवाहीचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रयजी बोडे सर यांचा सत्कार विद्यालया तर्फे घेण्यात आला.
यावेळी अमृतमहोत्सवी वर्षा निम्मित कार्यक्रम घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व गावातून व दानशूर व्यक्तिकडून विद्यालयास प्राप्त झालेल्या साहित्याचे उदघाटन करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी कार्यक्रमाच्या उदघाटन म्हणून वेंडली गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.प्रतिभाताई प्रकाशराव अलवलवर उपस्थित होत्या. सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणूंन संस्था उपाध्यक्ष मा.श्री.राजेंद्र मारोतराव काकडे मुख्याध्यापक अंमडापुर विद्यालय अंमडापुर, संजय पा. टोगे पोलीस पाटील, प्रकाशराव अलवलवर, बबन पा. पाचभाई, प्रभाकर पा. पाचभाई, गोवर्धन पा. पिंपलशेंडे, श्री.श्रीरंग पा. वरारकर, प्रमोद पा. नागपुरे, सौ.संध्याताई रणजित पिंपलशेंडे, रणजित पिंपलशेंडे, गुलाब पा. चालूरकर, चैत्यन गणेश मंडळ वेंडलीचे सर्व सभासद विद्यालयाचे मुख्याध्यापक पिंपळशेंडे सर, श्रीकृष्ण बरडे, चेतन देवाळकर, सतीश पाचभाई, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.काकडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.कराडे सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी संदीप पिंपलशेंडे, रुपेश चिवंडे, निलेश जोगी, सचिन किन्नके व माजी विध्यार्थी व विद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.