अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 22 ऑक्टोंबर:- शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावनेर शहर अध्यक्ष पदावर राजू खांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजूभाऊ राऊत यांच्या द्वारे नागपूर पक्ष कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
सावनेर शहर अध्यक्ष पदावर राजू खांडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी खासदार शरदचंद्र पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, सलील देशमुख, प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे, विधानसभा अध्यक्ष अमरबाबू जैन, नागपूर जिल्हा सचिव नानाभाऊ केने, युवराज मेश्राम तालुका अध्यक्ष, कपिल वानखेडे, सुरेंद्र वानखेडे यांचे आभार मानले.
राजू खांडे यांच्या नियुक्ती बद्दल अश्विन महाजन दशरथ मतेल, संकेत खांडे, नरेश कुछवाह, महेंद्र पुसान यांनी राजू खांडे यांचे अभिनंदन केले.

