Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

संघर्ष सेना (संतोष साठे) आणि धर्मरक्षक दलाच्या आंदोलनला यश ! भारती विद्यापीठ रुग्णालयासमोर आंदोलन : धर्मादाय रुग्णालयाच्या सुविधा नक्की कोणासाठी ?

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 23, 2023
in आंदोलन, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संघर्ष सेना (संतोष साठे) आणि धर्मरक्षक दलाच्या आंदोलनला यश ! भारती विद्यापीठ रुग्णालयासमोर आंदोलन : धर्मादाय रुग्णालयाच्या सुविधा नक्की कोणासाठी ?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- अर्धांगवायूचा (प्यारालिसिस) झटका आलेल्या एका रुग्णाला भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २४ तासांत या रुग्णालयाने ७० हजार रुपयांचे बील लावले. या रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरुवातील २७ हजार रुपये बील भरले होते. परंतु, पूर्ण रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याने रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते, संघर्ष सेना आणि धर्मरक्षक दलाच्या वतीने रात्री रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने तात्काळ रुग्णाला घरी (डिस्चार्ज) सोडले.

कोंढवा भागातील शिवनेरीनगर येथील विलास गुडेकर या रुग्णाला अर्धांगवायूबरोबर ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे धर्मादाय रुग्णालय असलेल्या भारती विद्यापीठ रुग्णालयात नातेवाईकांनी रुग्णाला दाखल केले. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्री २४ तासांत बिल जवळपास ७० हजार रुपये लावण्यात आले. या रुग्णाच्या घरात पत्नी आणि दोन मुलींना देखील हाच आजार आहे. तर रुग्णाचे वडील मनोरुग्ण आहेत. एकंदर या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे. या रुग्णाकडे केशरी रेशनकार्ड देखील आहे.

याबाबत रुग्णसेवक उमेश महाडिक म्हणाले की, भारती रुग्णालय खरं तर एक ट्रेनिंग सेंटर आहे. जिथे डॉक्टर निर्माण केले जातात. परंतु, येथे लोकांच्या जिवाशी अक्षरक्ष: खेळलं जात आहे. इतक्या योजना असतानाही गोरगरीबांना पैसे घेतल्याशिवाय उपचार केले जात नाही. हे रुग्णालय धर्मादाय अंतर्गत येते. पैसे नसल्याने बरेचजण उपचाराविना दगावले आहेत. एक तर योग्य उपचार नाहीत आणि अव्वाच्यासव्वा दर आकारले जातात.

कोट
संबंधित रुग्ण आमच्याकडे दाखल होता. सुरुवातीला त्यानी २७ हजार रुपये भरले होते. मात्र, त्यांचे बील ७० हजार रुपये झाले होते. परंतु, त्यांनी ते न भरता रुग्णालयामोर आंदोलन केले. कारण त्यांना पैसे भरायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी आंदोलन केले. आम्ही उर्वरित पैसे न घेता रुग्णाला घरी सोडले आहे.प्रवीण जाधव, बिलिंग विभाग प्रमुख, भारती विद्यापीठ रुग्णालय

कोट
खरं तर राज्य शासनाच्या वेगवेगळ््या योजनामध्ये त्यावर उपचार करता येते. मात्र, भारती विद्यापीठ रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असूनही रुग्णाकडून आधी अनामत रक्कम २७ हजार रुपये घेतले. तसेच २४ तासांत ७० हजार रुपये बिल लावले. तसेच मेडिकल आहे पण त्यात कोणतीही सवलत नाही. औषधांचाही खूप मोठा काळाबाजार येथे केला जात आहे. खरंतर या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून त्यांच्यावर वेगवेगळ््या योजनेतून उपचार करायला हवे होते. परंतु, रुग्णालय त्याबद्दल रुग्णाला कोणतीही माहिती देत नाही. उलट आवाच्यासव्वा बील लावल्याने आम्ही रुग्णालयाविरोधात आंदोलन करत धर्मादाय रुग्णालय नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न आम्ही उपस्थित केला. परंतु, त्याचे उत्तर रुग्णालय प्रशासनाने दिले नाही.

– संतोष साठे, अध्यक्ष, संघर्ष सेना

Previous Post

समर्पण फाऊँडेशन सावनेर तर्फे भव्य रोगनिदान, रक्तदान व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न.

Next Post

सराईत गुन्हेगाराकडुन २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १०,८०,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सराईत गुन्हेगाराकडुन २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १०,८०,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त

सराईत गुन्हेगाराकडुन २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १०,८०,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In