पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी हा पहाटेचे वेळी उघडे दरवाजावाटे, कॉलेज परीसरातील
हॉस्टेलमध्ये प्रवेश करून विदयार्थीच्या रुममध्ये चार्जिंगला लावलेले किंवा ठेवलेले लॅपटॉप चोरी करून गुन्हा करीत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे वारंवार घडणा-या गुन्हयांचा पध्दतीचा अभ्यास करून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काइगडे यांनी तपास पथकातील अधिकारी सपोनि गजानन जाधव व सपोनि रविंद्र गोडसे याना लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी योग्य त्या सुचना देवून रायसोनी कॉलेज परिसरात तपास पथकातील पोलीस अंमलदार याना पेट्रोलिंग करणेबाबत व सापळा लावुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
तपास पथकातील सपोनि गजानन जाधव, सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस नाईक ७४४७ फरांदे, पोलीस नाईक ७३९७ जगताप, पोलीस शिपाई ६४९७ ढोणे, पोलीस शिपाई १०५९४ माने असे दिनांक १५/१०/२०२३ रोजी रायसोनी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करुन सापळा लावुन थांबले असताना रायसोनी कॉलेज परिसरात लॅपटॉप चोरी करणारा चोरटा हा रायसोनी कॉलेजचे मुख्य गेट समोर उभा असुन त्याने अंगात फुल बाहयांचा निळया रंगाचा शर्ट व काळया रंगावी पॅन्ट घातलेली आहे. सदरची बातमी पोलीस नाईक ७४४७ फरावे यांनी तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना सांगितली असता त्यांनी वरील पोलीस स्टाफचे मदतीने रायसोनी कॉलेज समोरील मुख्य गेट समोर यशस्वी सापळा लावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे अंगात फुल बाह्यांचा निळया रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेली इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता निलेश प्रफुलचंद कर्नावट, वय ३९ वर्ष, रा. मु.पो. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव असे असल्याचे सांगितले. तसेच आम्ही लॅपटॉप चोरी झालेल्या घटनास्थळ ठिकाणांचे सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला आरोपी एकच असल्याचे समजुन आल्याने त्यास विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बॉयसेस कॉलेज, एमआयटी कॉलेज, वारजे माळवाडी, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटॉप चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपीचे ना. न्यायालयाकडुन पोलीस कस्टडीची रिमाड घेवुन आरोपीकडुन वेगवेगळया कंपनीचे एकूण २७ लॅपटॉप, १ टॅब व १ मोबाईल हॅण्डसेट असा एकूण १०,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक अजित फरांदे हे करीत आहोत..
सदरची कामगिरी मा. श्री. शशिकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्री. विश्वजीत काइंगडे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मा. श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव, रविंद्र गोडसे, सपोफी बाळासाहेब सकाटे, पोलीस हवालदार संदीप तिकोणे, पोलीस नाईक अजित फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने मल्हारी सपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण यांनी केली आहे.

