उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे दि.20:- येथील महात्मा फुले वाडा येथे विविध भागातील महिला एकत्र येऊन क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून सामाजिक, शैक्षणिक आणि वर्तमान राजकीय परिस्थिती वर चर्चा करण्यात आणि पुढील नियोजन ठरविण्यात आले.
आज देशात आणि राज्यात विविध प्रश्न निर्माण झाले आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, महिला अत्याचार सह अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे पुणे शहरातील शेकडो महिलानी एकत्र येऊन आपले समाजाप्रती असलेले देणे म्हणून आपण समाजाच्या विविध मुद्द्यांवर आवाज बुलंद करून न्याय, हक्कासाठी कार्यकरण्यासाठी आणि पुढील आव्हाने भेदण्यासाठी एकत्र आल्या.
यावेळी मानसी वानखेडे, मनीषा कसबे, आशाताई बैसाने, रंजना कांबळे, अरुणाताई गायकवाड, नंदा उबाळे, रेखा कापसे, मंगलाताई मुनेश्वर, सरिता सोनावणे, वीणा कांबळे या महिला सह शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी बार्टी या अनुसुचित जाती आणि जमातीसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला निवेदन देणे, भिडे वाडा संबंधी एक महिना वाट बघून … पुढील कामासाठी पाठपुरावा करणे, ग्रामीण भागातील मुलींची निवासी अभ्यासिका उभरण्यावर जोर देणे, राजकीय क्षेत्रात विशेषतः वंचित बहुजन आघाडी कडून महिला निवडणूक लढण्यास उत्सुक असल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांच्या सोबत राहून काम करणे अशा अनेक चर्चा यावेळी करण्यात आल्या.