हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी एका कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम, प्रमुख उपस्थिती श्री. आर. के. वानखेडे यांची होती. यावेळी प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम व प्रमुख उपस्थिती श्री. आर. के. वानखेडे यांनी शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या जीवनपटावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. एम. चव्हाण सर, संचालन व आभार प्रदर्शन सौ. एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमात श्री. यु. के. रांगणकर सर, श्री. चंदावार बाबू, श्री. जगदीश कांबळे, श्री. वामनभाऊ बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

