धम्मचक्र प्रवर्तन दिना निम्मित मिरज येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई न केल्याबद्दल सांगली महानगरपालिकेचा निषेध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती बरखास्त करण्याची मागणी…
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज दि. २४ ऑक्टोबर:- १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयादशमी दिनी धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायी समवेत घेतली. म्हणून अशोका विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशभरात दरवर्षी साजरा केला जातो.
परंतु अशोका विजयादशमीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरज येथील पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या लोकांची कोणत्याही प्रकारची व्यवस्था सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने केली नाही. तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ कोणत्याही प्रकारचे विद्युत रोषणाई महानगर पालिका व पुतळा समितीने केली नाही त्यावर वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका सोशल मीडिया प्रमुख मिलिंद कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती बरखास्त करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे, सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, नजीर झारी, मनोहर कांबळे, सागर आठवले, सतीश शिकलगार, धीरज कांबळे, मनोज कांबळे, महबुब आली मनेर, अस्लम भंडारी, जमीर डांगे, इकबाल बागवान आदी उपस्थित होते.

