हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन भेदोडा दि. 24 ऑक्टोंबर:- रोज मंगळवारला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरयांनी स्थापन केलेली भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा भेदोडा व प्रज्ञ शिल करुणा मंडळ तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुध्द आणि सम्राट अशोक व बोधिसत्व, महामानव, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अगरबती, मेणबत्ती दीप प्रजलीत झाले सामूहिक धम्मध्वज व त्रीशरण पंचशील घेण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बाबासाहेबाची धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोंबर का विजयादशमी या विषयावर किशोरभाऊ तेलतुंबडे केंद्रीय शिक्षक व शहर सरचिटणीस चंद्रपूर यानी यांनी अगदी सविस्तर पने समाज प्रबोधन केले. नंतर कैविशताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर आणि भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र शाखा मध्ये सघटक पद आहे यांनी अगदी एक तास सविस्तर पने मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये धर्मुजी नगराळे, गौतम चौरे, मुरलीधर ताकसांडे, कुषनदास गजभिये, दीपक मेश्राम, किरण कुंभारे, शंकर रत्ने, शंकर झाडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्या अमूल्य वेळ देवून प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन व आभार प्रदर्शन आयु.विश्वनाथ गोवर्धन सरांनी केले. या कार्यक्रमला भेदोडा गावातून बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.