आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबा.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भाजपचा बालेकिल्ला होत असलेल्या हिंगणघाट मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसने कुरघोडी करणे सुरू केली आहे. यापूर्वी अनेक शहरी पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडली. तर आता ग्रामीण भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात यावेळी दहेगाव(उजवणे) माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाभुळकर, गौतम लाडंगे, विनोद भुजाडे, स्वपिल आत्राम, अमर बावने, राजकुमार बाभुलकर , वनिता लाडंगे, वनिता सुरपान, पुनम थुल, विठ्ठल किन्हेकर, कवडू सुरपान, पराग बाभुलकर, अंकित तळवेकर,राजू बावणे, प्रज्वल बाभुलकर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुप्पटा घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वांदिले यांच्या मार्गदर्शनात पक्षकार्य करणार असल्याचे ते म्हणाले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन प्रमुख पक्ष म्हणून हिंगणघाट मतदारसंघात एकमेकांवर कुरघोडी करीत असून पुढे हा सामना अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.
या पक्ष प्रवेश सोहळावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक डगवार, अमोल बोरकर सुनिल भुते, पप्पू आष्टीकर, सुशील घोडे, राजू मुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

