आमदार कुणावार तुम्ही गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी अति महत्वाच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थे कडे कितीही दुर्लक्ष केले तरी आम्ही अखेर पर्यंत व्यवस्थेसाठी लढणार
🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेच्या विरुद्ध रुग्णमित्र गजू कुबडे यांचे 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत आमदार कुणावर याना निवेदन देण्यात आले आहे.
हिंगणघाट मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालयाची भलीमोठी इमारत डौलाने अनेक वर्षापासून उभी आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड सुविधाचा अभाव आहे त्यात प्रामुख्याने 1) लहान मुलांचे डॉक्टर यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी,
2) सोनोग्राफी मशीन चालविण्या साठी रेडीओलॉजिस्टची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी 3) जनरल फिजिशियन ( एम डी) डॉक्टर ची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी 4)गावभर वाजागाजाकरून उद्घाटन केलेले व त्याच दिवसापासून बंद असलेले मॉड्युलर आय सी यू त्वरितसुरू करण्यात यावे तसेच 5) रोगराईचे मुख्य कारण असलेल्या साफसफाई करीता उपजिल्हा रुग्णालयात सफाई कामगारांची भरती करण्यात यावी मागणीसाठी प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे हे दि 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन सुरु करणार असून विशेष म्हणजे कुबडे यांचे हे आंदोलन एका जागेवर बसून न करता चालत्या फिरत्या स्वरूपात असणार आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात असंख्य समस्या आहेत. परंतु या समस्याकडे आमदार कुणावार यांचे लक्ष कधीच जात नाही. हे आमच्या मतदारांचे दुर्दैव आहे असा आरोप कुबडे यांनी केला व केवळ रस्ते व नाल्याचे बांधकाम करून जनतेला न्याय मिळू शकत नाही. आज येथील शेतमजूर, गिरणी कामगार वंचित व गोरगरीब जनतेला आरोग्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एखाद्या रुग्णाला भरती केले तर येथील डॉक्टर त्या पेशन्टला त्वरित सेवाग्राम सावंगी किंवा नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला देतात. हे कुणावार यांच्या कार्यसम्राट या पदवीला शोभणारे आहे नाही असा उपरोधीक टोलाही त्यांनी लगावला आहे.
एव्हडी भव्य दिव्य पदवी घेऊन आमदार वावरत असतात परंतु ज्या गोरगरीब जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून एकदा नाही तर दोनवेळा या मतदार संघाची सेवा करण्याची संधी दिली त्या मतदारांचा कुणावार हे उपमर्द करीत आहेत असे दिसून येत आहे. त्यामुळेच कार्यसम्राट ह्या पदवी धारण करण्याच्या त्यांच्या भूमिकेबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण होत आहे. कार्यसम्राट ह्या स्वतःला लावून घेतलेल्या पदवीचा सन्मान राखण्यासाठी रस्ते नाल्या व पूल याच्या बाहेर निघून येथील गोरगरीब वंचित जनतेच्या प्रश्न कडे आपण गंभीरतेने लक्ष दिल्यास येथील जनता आमदाराला कार्यसम्राट म्हणून डोक्यावर घेऊन निश्चित पणे नाचेल. असे मत कुबडे यांनी व्यक्त केले आहे.
यासाठी त्यांनी सर्वप्रथम येथील आरोग्याच्या महत्वपूर्ण प्रश्नकडे लक्ष द्यावे अशी विनंती करुंन व या आरोग्याच्या प्रश्नासाठी येत्या 7 नोव्हेबर पासून चालते फिरते बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन व या विभागाचे आमदार म्हणून कुणावर यांचीच राहणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी तात्काळ युद्धपातळीवर कुणावार यांनी पुढाकार घ्याल व जसे कुणावार हे रस्ते व नाली बांधकामसाठी निधी खेचून आणता असे आम्ही बॅनरवर वाचतो तसेच या उपजिल्हा रुग्णालयासाठी सरकार दरबारी भांडून या सद्या शोभेच्या असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विकासासाठी काहीतरी कराल अशी विंनती रुग्णमित्र गजू कुबडे यांनी या निवेदनातून केलेली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

