- आदर्श शाळेतील स्काऊट -गाईड युनिट ने राबवीला गणेश उत्सव सेवा प्रकल्प.
- स्वच्छता अभियान व निर्माल्य संकलन उपक्रम राबाविले.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
राजुरा 6 सप्टेंबर:- सविस्तर वरहत या प्रमाणे आहे. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील छ. शिवाजी महाराज स्काऊट युनिट व जिजामाता गाईड युनिट च्या वतीने गणेश उत्सव सेवा प्रकल्पात सहभागी होऊन निर्माल्य संकलन कार्य करणे, सफाई, श्रमदान मोहीम व इतर सेवा विषयी कार्य करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांची विशेष उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार जांभूळकर, प्रशासकीय अधिकारी न. प.राजुरा, संकेत नंदवंशी, पाणीपुरवठा अभियंता, आदित्य खापणे, विद्युत अभियंता, उपेंद्र धामंगे, कर निरीक्षक, अश्विनकुमार भोई, लेखापाल अभिनंदन काळे, माजी न. प. सभापती तथा माजी नगरसेवक आनंद दासरी, स्काऊट लीडर बादल बेले, गाईड लीडर रोशनी कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने गणेश उत्सव सेवा प्रकल्पाकरिता आदर्श शाळेची निवड करण्यात आली होती. या अंतर्गत आदर्श शाळेपासुन प्रभातफेरी काढून जवाहर नगर येथील गणराज गणेश मंडळाला भेट देऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगर परिषद येथील तलावासमोर असलेले निर्माल्य संकलन कलश, गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी पाण्याचा कृत्रिम हौद तयार करण्यात आला. या ठिकाणी भेट देऊन निर्माल्य संकलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट लीडर बादल बेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता छ. शिवाजी महाराज स्काऊट युनिट, जिजामाता गाईड युनिट व आदर्श हायस्कुल येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.
सूर्यकांत पिदूरकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी, न. प. राजुरा, चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने गणेश उत्सव सेवा प्रकल्पाकरिता आदर्श शाळेची निवड झाली. या शाळेतील विद्यार्थी व त्यांचे युनिट लीडर शिक्षक यांनी मुलांना प्रत्यक्ष निर्माल्य संकलन व पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी करून घेतले. खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर प्रत्येकाने निर्माल्य संकलन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू व सोबतच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचाही आनंद घेऊ. नदी, नाले, तलाव प्रदूषित होणार नाही याची काळजी घेऊ. जल प्रदूषणाला आळा घालू असे प्रतिपादन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले.
राजुरा शहरातील गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक कृत्रिम पाण्याच्या हौदा मध्ये गणेश मूर्ती चे विसर्जन केल्यानंतर व निर्माल्य संकलन कलश मध्ये निर्माल्य टाकल्यानंतर प्रत्येक गणेश भक्तांना नगर परिषद राजुरा तर्फे वृक्ष भेट देण्यात येते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किट व चॉकलेटचे वितरण करण्यात आले.