मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र
संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील प्रसिद्ध कापड गिरणी असलेल्या गिमाटेक्स या कंपनीच्या वणी युनिट मध्ये इएसआयसी हिंगणघाट शाखेचे अधिकारी निरज साखरकर यांनी भेट देऊन कामगाराचे प्रश्न कडे सोडविता येईल यासाठी गिमाटेक्स व्यवस्थापनाला कंपनी कामगारांना ईएसआयसी अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे निर्देश दिले.
दि.२ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत कंपनी आणि कामगार याच्या विविध विषयी आढावा जाणून घेतला, यावेळी कंपनी व्यवस्थापक शाकीर पठाण, वरीष्ठ व्यवस्थापक चंदनसिंग झाला उपव्यवस्थापक जुमडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सरचिटणीस पांडुरंग बालपांडे, दामोदर देशमुख,विजय थुल, दिवाकर बरबटकर,राकेश तराळे, श्रावण थुटे, राहुल देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.