उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप पाटिल उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या मार्फत बुलढाणा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आली.
त्यात म्हटल आहे कि, मेहकर शहरातील एमआयडीसी मध्ये जे काही अतीक्रमण आहे ते काढण्यात यावे. या एमआयडीसी मध्ये बोगस नोंदणी करुन भुखंड त्यांच्या नावांवर केले आहे त्या लोकांनवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच बोगस कंपन्या नोंदवुन उद्योजकांनच्या नावाखाली ज्यांनी भुंखंड हाडपले आहेत त्यांची व त्यांना भुखंड देणार्या अधिकारी यांची खाते निहाय चौकशी करण्यात यावी जर या प्रकरणी कारवाई न झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, गौतम नरवाडे, कुणाल माने, राधेशाम खरात, संतोष अवसरमोल, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, सिताराम गवई, महादेव मोरे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

