अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 4 नोव्हेंबर:- सावनेर तालुक्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ढालगाव खैरी येथील रहिवासी तसेच सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेरच्या सदस्या रुखमाबाई गजानन निखाडे याच आज वयाच्या 75 वर्षी निधन झाले.
रुखमाबाई गजानन निखाडे या सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेरच्या सदस्या होत्या. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांचं 3 नोव्हेंबरला रात्री 1.30 वाजता अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांना 4 नोव्हेंबरला ढालगाव खैरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
रुखमाबाई गजानन निखाडे याच्या दुःखद निधनाने निखाडे कुटुंबात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे 1 मुलगी, नातू व बराच मोठा आप्त परिवार आहे.

