महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पैठणच्या कारकीन येथे एक पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे पतीने आधी राहत्या घरात पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्यावर जखमी अवस्थेतच पत्नीला आरोपी पतीने गावाच्या चौकात आणून सोडून दिले, आणि त्यानंतर तो पसार झाला.
या खळबळ उडवून देणाऱ्या घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच फरार होणाऱ्या आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सोनाली आतिष ताकवाले वय 25 वर्षे असे मृत महिलेच नाव असून, आतिष रावसाहेब ताकवाले वय 30 वर्षे असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सोनाली ताकवाले आणि आतिष ताकवाले हे पती पत्नी कारकीन गावात आपल्या मुलीसह राहतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान काहीतरी कारणावरून सोनालीने आपल्या मुलीला मारहाण केली. त्यामुळे मुलीला मारू नको म्हणत आतिषने भूमिका घेतल्याने पत्नी पत्नीमध्ये वाद झाला. सुरवातीला शाब्दिक वाद थेट हाणामारीपर्यंत गेला आणि अतिष प्रचंड रागात होता. त्यामुळे त्याने थेट घरातील कुऱ्हाडीने सोनालीवर वार केला. ज्यात सोनाली गंभीर जखमी झाले. सोनालीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्यावर ती जागीच कोसळली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. मात्र, त्यानंतर देखील अतिषचा राग कमी झाला नाही. सोनाली गंभीर जखमी झाल्यावर देखील त्याने तिला गावातील रस्त्यावर ओढूत आणले. तसेच पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार करून जागीच ठार केले. त्यानंतर तो मुलीला घेऊन फरार झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवला.
यावेळी पोलिसांच्या पथकाने आरोपी अतिषचा शोध सुरु केला. तसेच त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. यावेळी आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पैठण एमआयडीसी पोलिसांत त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

